मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिमग्यावर बोलणार नाही', फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

'शिमग्यावर बोलणार नाही', फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या मुद्यावर हात घातला. उद्धव ठाकरे यांनी कधीही मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 05 ऑक्टोबर : 'उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो काही झाली. त्यावर मी काही बोलणार नाही, कारण शिमग्यावर काही बोलायचे नसते. शिमग्या शिवाय त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा अखेर पार पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मेळाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

पहिली गोष्ट तर अशी मी दोन्ही भाषणं ऐकलं नाही. मी धम्मचक्र प्रवृतक दिनाच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये होतो. पण रात्री उशिरा मला दोन्ही मेळाव्याचा सारांश कळाला. एकनाथ शिंदे यांचे भाषण मी युट्यूबवर पाहिले. उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो काही झाली. त्यावर मी काही बोलणार नाही, कारण शिमग्यावर काही बोलायचे नसते. शिमग्या शिवाय त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

(एकनाथ शिंदेंनी मोडला पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड, शिवसेनेपेक्षा दुप्पट जमवली गर्दी!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी अभिनंदन करतो. काल त्यांनी दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे. बीकेसी मैदानावर तुडुंब गर्दी भरली होती. या मैदानावर महाराष्ट्र भरातून लोक आली होती, असं म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भाजपकडून होती, यावर फडणवीस म्हणाले की, 'त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, कारण तेच तेच बोलत आहे. नवीन काहीही नाही. आम्हालाही आता कंटाळाला आला आहे.'

विधानसभेवर भगवा फडकरणारच आहे. तो खरे शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने आणि भाजपच्या मदतीने फडकणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

(Dasara Melava : 'आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची', ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार)

अजित पवार काय म्हणाले मला माहिती नाही, शिवसेना फुटीचे कारण हेच आहे की, त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आचारण स्वीकारले. मुंबईमध्ये साखळी स्फोट घडवणाऱ्या आरोपींना ते सोबत घेऊन बसले, त्यामुळे शिवसेना फुटली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या मुद्यावर हात घातला. उद्धव ठाकरे यांनी कधीही मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं नाही. त्यांनी नेहमी शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच भाषण केलं आहे, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.

First published: