नवी दिल्ली, 24 मार्च : पुणे विमानतळ (Pune Airport) विस्तारीकरणाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन उभे गट (two groups in BJP) पडले असल्याची चित्र पाहायला मिळाले. गेल्या दोन दशकांपासून पुणे विमानतळ उभारण्यासाठी लढाई लढत असलेले पुण्याचे लोकसभेचे खासदार गिरीश बापट आणि राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यामध्ये हे दोन गट पडले असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
पुणे विमानतळाचे विस्तारीकरण (Pune Airport Expansion) तसेच पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळ या विषयावर चर्चा खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, खा. प्रकाश जावडेकर, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचे शिष्टमंडळ केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. यावेळी जेव्हा या शिष्टमंडळात गिरीश बापट का नाही असा सवाल केला असता ते आजारी आहेत असे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी गिरीश बापट हे पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेत होते.
वाचा : देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब,BMCतील भ्रष्टाचाराबाबत गौप्यस्फोट
यावेळी केंद्रीय माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली की, पुण्यातील होऊ घातलेल्या विमानतळ संदर्भात ज्योतिरादीत्य सिंधिया यांची भेट घेतली. सध्याच्या एअरपोर्ट मधील कार्गो हब हलवण्यासाठी डिफेन्सनं जागा देऊ केली आहे.
पुणे विमानतळ टर्मिनल नवे आणि जोडले जाईल. पुणे विमानतळ अडचणी सांगितल्या. त्या सोडवण्याचे सिंधियांनी मान्य केली.
पुरंदरच्या जागा संदर्भात सर्व परवानग्या मिळाल्या होत्या परंतु सरकार बदलल्यानंतर विनाकारण लांबवण्याचा खेळ चालू आहे. पूर्वी मंजूर केलेल्या जागेवर लगेच कार्यवाही सुरू करता येईल. महाराष्ट्र सरकारनं मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी. आडकाठी आणण्याचं काम महाविकास आघाडी करतंय, असे सांगितले.
वाचा : ठाकरे सरकारला झटका, परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेली सर्व प्रकरणं CBI कडे वर्ग
महाविकास आघाडी सरकारनं पाप केलंय, असे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. पुण्यातील विमानतळ इतर कुठेही हलवू नये. सद्याचे विमानतळ जिथे आहे त्याच्या आजूबाजूची जागा घेवून बेस विमानतळ बनवावे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची आग्रही मागणी केली. सुपा आणि बारामतीला विमानतळ बनवायचे असेल तर वेगळे विमानतळ बनवावे,अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Delhi, Pune, Pune airport