परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केला होता. 20 मार्च 2021 या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसूली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. वाचा : कर वसूलीसाठी गेलेल्या BMCच्या टीमवर हल्ला, मनपा अधिकाऱ्याचा डोळा थोडक्यात बचावला परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब नंतर परमबीर सिंह यांच्यावर आरोप करत महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पाचही एफआयआरचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश आता सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी मुंबई हायकोर्टात परमबीर सिंह यांनी याचिका केली होती की, सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयने करावा. मात्र, मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांच्या सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली आहे. परमबीर सिंह यांच्यावर दाखल गुन्हे गुन्हा क्रमांक 1 जुलै 2019 मध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये 15 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी भाईंदरमधील बिल्डर श्यामसुंदर अग्रवालांची तक्रार. परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. याप्रकरणी सुनील जैन आणि संजय पुनामिया यांना अटक, एसआयटीकडून तपास सुरू. गुन्हा क्रमांक 2 जुलै 2019 मध्ये कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह, एक पोलीस उपायुक्त आणि इतर तिघांविरोधात खंडणी, फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल. एसआयटीकडून तपास सुरू. गुन्हा क्रमांक 3 ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि इतर 26 जणांविरोधात केतन तन्नांकडून खंडणीचा गुन्हा दाखल. एसआयटीकडून तपास सुरू. गुन्हा क्रमांक 4 एप्रिल 2021 मध्ये अकोल्यात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगेंकडून एससी, एसटी अॅक्ट अंतर्गत परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल गुन्हा कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला. एसआयटीकडून तपास सुरू. गुन्हा क्रमांक 5 हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी, बिमल अग्रवालांची तक्रार परमीबर, सचिन वाझे आणि इतर काही जणांवर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.[BREAKING] #SupremeCourt ORDERS TRANSFER OF ALL CASES AGAINST Mumbai's former top cop Param Bir Singh – facing allegations of misconduct and corruption TO THE CBI #ParamBirSingh https://t.co/JLCHfpCXBU
— Bar & Bench (@barandbench) March 24, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.