मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर

धक्कादायक! पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर

ॲटमॉस्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पुण्यातील विमाननगरमधील एका इमारतीत हे सलून सेंटर आहे.

ॲटमॉस्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पुण्यातील विमाननगरमधील एका इमारतीत हे सलून सेंटर आहे.

ॲटमॉस्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पुण्यातील विमाननगरमधील एका इमारतीत हे सलून सेंटर आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 3 जुलै : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मसाज सेंटरमध्ये चक्क वेश्या व्यवसाय (Prostitution business in pune) सुरू असल्याचे उघड झाले. सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department Pune) हा प्रकार समोर आणला आहे. एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात होता. विमाननगरमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. (Prositution Business in Vimannagar pune)

काय आहे संपूर्ण घटना -

मसाज सेंटरमध्ये एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली विमाननगरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सामाजिक सुरक्षा विभागाने विमाननगरमधील हा प्रकार समोर आणला. याप्रकरणी मसाज सेंटरच्या मालकासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 8 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

अशा प्रकारे पोलिसांची कारवाई -

ॲटमॉस्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पुण्यातील विमाननगरमधील एका इमारतीत हे सलून सेंटर आहे. याठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 8 तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रोख रकमेसह अन्य साहित्य मिळून एकूण 1 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - Pune crime: पुण्याची तरुणी प्रियकराच्या शोधात पोहचली थेट बारमेरला; तिथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने झाली सुन्न

यांच्यावर गुन्हा दाखल -

मसाज सेंटरमधील व्यवस्थापक हिना अकबरअली सय्यद (वय 30, रा. लोहगाव), सहायक व्यवस्थापक ताजुल इस्लाम अब्दुल वाहीद (वय 33, रा. विमाननगर) व फारुख अहमद, बदुल अहमद (वय 32, रा. विमाननगर) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मसाज सेंटरचा मालक सुरेश बाबुलाल परदेशी (रा. कसबा पेठ), संदीप शरदचंद्र सहस्त्रबुद्धे (रा. श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी), अविनाश खिंवसरा (रा. कसबा पेठ), मसाज सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देणारा मालक अविनाश भाऊसाहेब साकोरे, भाऊसाहेब साकोरे यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Police, Pune crime news, Sex racket