Home /News /maharashtra /

Pune crime: पुण्याची तरुणी प्रियकराच्या शोधात पोहचली थेट बारमेरला; तिथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने झाली सुन्न

Pune crime: पुण्याची तरुणी प्रियकराच्या शोधात पोहचली थेट बारमेरला; तिथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने झाली सुन्न

 प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

बारमेरमधील धोरिमानाच्या भुनिया येथील रहिवासी असून तो पुण्यात एका कापडाच्या दुकानात कामाला होता, तिथे मुलीची आरोपीशी ओळख झाली आणि ही मुलगी अल्पवयीन असताना..

    पुणे, 01 जून : पुण्यातील एक तरुणी तिच्या प्रियकराच्या शोधात राजस्थानमधील बारमेर येथे त्याच्या घरी पोहोचली. मात्र, प्रियकराच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं, त्यानंतर पीडितेने बारमेरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित विष्णू विष्णोई नामक तरुण आणि त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणाने मुलीवर अनेक महिने शारीरिक (Pune crime news) अत्याचार केले. पुण्यातील ही तरुणी तिच्या घरापासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या बारमेरला गेली होती. आपल्याशी घडलेल्या प्रकारामुळे तिने बारमेरचे प्रभारी पोलीस अधीक्षक नरपत सिंग यांना निवेदन सादर केले. पुण्यात लग्नाच्या बहाण्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने कायदेशीर कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बारमेरमधील धोरिमानाच्या भुनिया येथील रहिवासी असून तो पुण्यात एका कापडाच्या दुकानात कामाला होता, तिथे मुलीची आरोपीशी ओळख झाली आणि ही मुलगी अल्पवयीन असताना तिने त्याच्यासोबत जबरदस्ती केली. लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार पीडितेने असेही सांगितले की, जेव्हा ती आरोपी विष्णू विष्णोईला त्याच्या घरी भेटायला आली, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिलीच. शिवाय तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल केले. पीडितेने विष्णूवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. पीडितेने बारमेरचे प्रभारी पोलीस अधीक्षक नरपत सिंग यांना निवेदन दिले असून पुण्यात आपल्याशी लग्नाच्या बहाण्याने इच्छेविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम पोलीस अधीक्षक नरपत सिंह म्हणतात की, मुलीने तक्रार दिली आहे, त्यानुसार संबंधित कुटुंबावरील कारवाईसाठी हे प्रकरण धोरिमाना पोलीस अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले आहे. हा प्रकार पुण्यात घडलेला असल्याने त्या भागातील पोलिसांची देखील मदत घेतली जाईल आणि नियमानुसार जी कारवाई होईल, ती कायदेशीररित्या केली जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Pune crime

    पुढील बातम्या