Home /News /maharashtra /

पुणं हादरलं! पोटच्या मुलीवरच जन्मदात्याकडून वारंवार बलात्कार

पुणं हादरलं! पोटच्या मुलीवरच जन्मदात्याकडून वारंवार बलात्कार

Pune Crime: बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. घरी कोणती नसताना हा नराधम संधी साधत होता. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे या प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

    पुणे, 27 मे : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या (Physical Abused) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकांनी बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याचेही तुम्ही वाचले असेल. त्यात आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या हडपसर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका 68 वर्षीय नराधम बापाने आपल्या पोटच्याच मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे पोटच्या मुलीवर बलात्कार (Rape on Daughter) केल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. यानंतर पोलीस तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. घरी कोणती नसताना हा नराधम संधी साधत होता. विशेष म्हणजे त्याची पत्नी घरी नसताना तो त्याच्या मुलीवर अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर तिला या प्रकाराबद्दल कुणालाही सांगू नये, अशी धमकीही देत होता. अखेर नराधम बापाच्या अत्याचारा कंटाळून पीडित मुलीने आपल्या बापाचे कारनामे उघड केले. तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. पुण्यातील हडपसर याठिकाणी ही घटना घडली. हेही वाचा - तरुणीच्या बेडरुममध्ये घुसणे पडले चांगलेच महागात; विनयभंग केल्याने न्यायालयाने सुनावली शिक्षा हा नराधम बाप आपल्या मुलीवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करीत होता. तसेच आपल्या मुलीला त्याने याबाबत कुणालाही सांगू नये, अशी धमकीही दिली होती. तिने याबाबत तिच्या आईला सांगितलं. यानंतर आईला धक्काच बसला. तिच्या आईने या प्रकाराबाबत नराधम पतीकडे विचारणा केली असता, त्यांच्यात जोरदावर वाद झाला. इतकेच नाही, तर नराधम पतीने आपल्या पत्नीलाही जोरदार मारहाण केली, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे. तर नुकतेच ते त्यांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न ठरविण्यासाठी गेले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape news

    पुढील बातम्या