मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Engineers Day : लॉकडाऊनमध्ये शोधलं नवं आकाश, पुण्याच्या इंजिनिअर्सची 5 देशांमध्ये भरारी VIDEO

Engineers Day : लॉकडाऊनमध्ये शोधलं नवं आकाश, पुण्याच्या इंजिनिअर्सची 5 देशांमध्ये भरारी VIDEO

X
पुण्यातील

पुण्यातील अभियंता सुधाकर जाधव यांनी एक्सोलोटल्स इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीची स्थापना 2015 साली केली.

पुण्यातील अभियंता सुधाकर जाधव यांनी एक्सोलोटल्स इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीची स्थापना 2015 साली केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 15 सप्टेंबर : आज 15 सप्टेंबर अभियंता दिन आहे. अभियंता दिन हा आपल्या देशातील सर्व अभियंत्यांना प्रेरणा देणारा दिवस आहे. ज्यांनी राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. असं म्हणतात की हे जग संपूर्ण अभियंता चालवतात. याच अभियंता दिनानानिमित्त आज आपण पुण्यातील एक्सोलोटल्स इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख सुधाकर जाधव यांनी आपल्या कंपनीची सुरुवात कशी केली जाणून घेणार आहोत. 

पुण्यातील अभियंता सुधाकर जाधव यांनी एक्सोलोटल्स इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीची स्थापना 2015 साली केली. या कंपनीद्वारे ते भारतासह देश-विदेशांमध्ये आपल्या सॉफ्टवेअरच्या सर्विसेस प्रोव्हाइड करतात. अभियंता सुधाकर जाधव सांगतात की, मी माझे शिक्षण पूर्ण झाल्यावरती दोन-तीन वर्ष जॉब केला त्यानंतर स्वतःचा बिजनेस स्टार्ट करण्याची उर्मी जागृत झाली. यानुसार मी पहिल्यांदा जेव्हा बिजनेस स्टार्ट करायचा विचार केला तेव्हा सर्वात मोठी समस्या इंटरनेटची होती. यावरती उपाय म्हणून मी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या फ्री इंटरनेट सेवेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसायाला सुरुवात केली आणि मी एक-एक ग्राहक जोडत आपला व्यवसाय सुरू केला.

त्यानंतर एका ठिकाणी एकल सीटचे शेअरिंग ऑफिस भाड्याने घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरु केला. 2019 पर्यंत माझा व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला होता. मात्र, अचानक 2019 - 20 ला संपूर्ण जगाला कोरोना महामारीने वेढले होते. यावेळी मला देखील भीती वाटली होती. कारण की इतक्या वर्ष जपलेलं स्वप्न पूर्ण महामारीच्या काळामध्ये उध्वस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा : गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; 'या' महापालिकेत मोठी भरती

पुढे बोलताना अभियंता सुधाकर जाधव म्हणातात की, कोरोना महामारी माझ्या बाबतीत इष्टापत्ती ठरली. त्या काळामध्ये मी पाहिले की अनेक लोक घरबसल्या वर्क फ्रॉम होम सोबतच विविध गेम देखील खेळत होते आणि या गोष्टीकडे मी लक्ष वेधून गेमिंग इंडस्ट्रीमध्ये उतरलो. हा माझ्यासाठी खरं पाहिलं तर पहिला अनुभव होता. मात्र, कोरोनाच्या काळामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं आणि सध्या मी भारतासह इतर पाच देशांना माझ्या कंपनीद्वारे गेमिंग इंडस्ट्रीला सुविधा पुरवत आहे. यामध्ये माझे इथे सध्या 25 एम्प्लॉईज काम करत असून या सर्वांची मला मोलाची साथ लाभत आहे.

मनात माझ्या जिद्द होती आणि ती मी पूर्ण केली

मी खरंतर बारामती सारख्या शहरातून पुण्यात आलो होतो. ह्या मोठ्या शहरांमध्ये काम करणं तसं खूप जिकरीची गोष्ट असते. पण जर तुम्ही जिद्दी असाल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अवघड नसते. मंदीमध्ये केलेल्या संधीचं सोनं झालं. आजच्या घडीला माझा व्यवसाय प्रॉफिटमध्ये तर आहेच पण या सोबतच येत्या काळामध्ये पन्नास देशांमध्ये मी सुविधा देण्याच्या दृष्टिकोन आणि तयारी सुरू केलेली आहे. यात मी नक्कीच यशस्वी होईल.

आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजेते ठरू शकतो. ज्यावेळी मला बिजनेस सुरू करायचा होता. त्यावेळेस माझ्याकडे उपलब्ध भांडवल देखील नव्हते. हो पण त्यावेळेस माझ्याकडे कल्पना होत्या त्यांच्यावरती मी काम केलं आणि आज मी त्याद्वारे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो. मला कोणत्याही प्रकारची व्यवसाय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही मात्र मनात माझ्या जिद्द होती आणि ती मी पूर्ण केली, असं अभियंता सुधाकर जाधव सांगतात.

First published:

Tags: Pune