जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : गणपती गावाला गेले तरी पालिकेला निर्माल्य उचलण्यास वेळ नाही! पाहा Video

Pune : गणपती गावाला गेले तरी पालिकेला निर्माल्य उचलण्यास वेळ नाही! पाहा Video

Pune : गणपती गावाला गेले तरी पालिकेला निर्माल्य उचलण्यास वेळ नाही! पाहा Video

पुणे महानगरपालिकेकडून निर्माल्य कलशांची सफाई अजूनही झालेली नाही.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 21 सप्टेंबर : पुणे शहरामध्ये कचऱ्याची समस्या नेहमीच मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. यामुळेच गणेशोत्सवानिमित्त पुण्यामध्ये विविध ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले गेलेले होते. नागरिकांनी आपल्या घरातील निर्माल्य नदीत फेकू नये, जेणेकरून नदी प्रदूषित होणार नाही ह्या हेतूने पुणे महानगरपालिकेडून शहरात विविध ठिकाणी आणि पुलावर निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव झाल्यानंतर अजूनही पुणे महानगरपालिकेकडून या निर्माल्य कलशांची सफाई अजूनही झालेली नाही. याबाबत लोकल 18च्या प्रतिनिधीने 20 सप्टेंबर 2022 रोजी काही ठिकाणी व्हिडिओ काढले आणि याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा जाब विचारला. मात्र, त्यांना बातमीची कुणकुण लागताचं त्यांनी रातोरात  11 च्या दरम्यान काही ठिकाणच्या निर्माल्य कलशा मधील कचरा साफ केला आहे. मात्र पुणे शहरांमध्ये गंज पेठ, पर्वती दर्शन, विविध झोपडपट्टी भागामध्ये सध्या ठीकठिकाणी निर्माल्य कलशमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. यामध्ये मुख्यत्वे झोपडपट्टी भाग इतर भागांमध्ये नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करत गेल्या काही दिवसांपासून कचरा तसाच ठेवला जात आहे आणि तो उचलला देखील जात नाही आहे. हेही वाचा :  फूड डिलिव्हरी बॉयने पुण्याच्या तरुणीला केलं किस, झोमॅटो म्हणतं तो माणूस… घनकचरा व्यवस्थापन अधिकारी असलेल्या आशा राऊत यांना आम्ही याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की आम्ही प्रत्येक वॉर्ड स्तरावरती दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत प्रशासनाला नक्कीच माहिती नसेल असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. कारण की जर असा कचरा साचत असेल तर नक्की वोर्ड ऑफिस स्तरावरती या सूचनांची अंमलबजावणी होत नाही असेच या साठलेल्या कचऱ्यामधून दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सांगितले की, महानगरपालिकेला दरवेळेस एखादी सूचना द्यावी लागते किंवा माहिती द्यावी लागते. कचरा काढण्यासाठी महानगरपालिका नेहमीच दुर्लक्ष करत असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pune
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात