जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फूड डिलिव्हरी बॉयने पुण्याच्या तरुणीला केलं किस, झोमॅटो म्हणतं तो माणूस...

फूड डिलिव्हरी बॉयने पुण्याच्या तरुणीला केलं किस, झोमॅटो म्हणतं तो माणूस...

फूड डिलिव्हरी बॉयने पुण्याच्या तरुणीला केलं किस, झोमॅटो म्हणतं तो माणूस...

पुण्यामध्ये 19 वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फूड डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरात 17 सप्टेंबरला इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप असलेल्या झोमॅटोवरून जेवण मागवलं.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 20 सप्टेंबर : पुण्यामध्ये 19 वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फूड डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरात 17 सप्टेंबरला इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप असलेल्या झोमॅटोवरून जेवण मागवलं. जेवण घेऊन आलेल्या 40 वर्षांच्या या व्यक्तीने मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून तिचा हात पकडला आणि तिला किस केलं, असा आरोप आहे. या प्रकरणी झोमॅटोने स्पष्टीकरण दिलं आहे. हा आरोपी झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनर नसल्याचं झोमॅटोने सांगितलं आहे. ‘आम्ही तपासाला सहकार्य करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही कोणत्याही व्यक्तीला संस्थेत सामील करण्याआधी थर्ड-पार्टी बॅकग्राऊंड चेक करतो. अशा प्रकारांमध्ये आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे,’ असं झोमॅटोने सांगितलं आहे.

जाहिरात

‘आरोपी रईस शेख शनिवारी रात्री 9 वाजता जेवण पार्सल देण्यासाठी गेला, तेव्हा त्याने मुलीकडे प्यायला पाणी मागितलं. पाणी पिताना त्याने मुलीशी बोलायला सुरूवात केली. रईसने मुलीला तिचं मूळ गाव आणि कॉलेचं नाव विचारलं. तुला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला सांग, असंही आरोपी या मुलीला म्हणाला. यानंतर आरोपीने मुलीला फोनवर मेसेज केला, पण लगेच त्याने हा मेसेज डिलीट केला,’ असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ‘मुलीने रईसला पाण्याचा ग्लास दिला तेव्हा त्याने तिचा हात पकडला आणि तिची छेड काढायला लागला. जेव्हा तरुणीने आरडा-ओरडा सुरू केला तेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सोसायटीच्या काही लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांकडे पाठवलं. यानंतर मुलीने पोलिसांकडे तक्रार केली,’ अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी रईस शेख याच्यावर आयपीसी 354 आणि 354 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आता त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात