पुणे, 28 ऑक्टोबर : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काल पुण्यात दिवाळी निमित आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी आले होते. भाजपकडून यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील येताच मोठ्या आवाजात गाणं वाजवण्यात आलं. गंमत म्हणजे ते गाणं होतं ‘राष्ट्रवादी पुन्हा…’. यानंतर पोलिसांनी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेण्यात आणि त्याच्यावर विना परवाना डिजे लावल्याबद्दल तक्रार करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातल्या रास्ता पेठ भागात आले होते. ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावलं. यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतलं, त्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले. त्यामुळे परिसरात एकच वातावरण तापले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गाणे!!! #ChandrakantPatil #NCPSong #Pune pic.twitter.com/AgC5NnJkgY
— News18Lokmat (@News18lokmat) October 28, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत दादा रास्तापेठेत आले असतानाच तिथे गवळी समाजाकडून सगर सण साजरा केला जातो. त्यानिमित्त म्हशी, हाल्यांची साग्रसंगीत मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीत हे गाणं वाजलं असल्याची माहिती समोर आली आहे.