जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चारित्र्याच्या संशयावर पत्नीची क्रूरपणे केली हत्या; पुण्याच्या कारागृहात आल्यानंतर पतीचाही मृत्यू

चारित्र्याच्या संशयावर पत्नीची क्रूरपणे केली हत्या; पुण्याच्या कारागृहात आल्यानंतर पतीचाही मृत्यू

चारित्र्याच्या संशयावर पत्नीची क्रूरपणे केली हत्या; पुण्याच्या कारागृहात आल्यानंतर पतीचाही मृत्यू

सचिन याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 जुलै : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहात (Yerwada Jail Pune) एका आरोपीने गळफास (Suicide in Yerwada Jail) घेतल्याची घडना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सचिन मधुकर नरवाडे, असे मृताचे नाव आहे. सचिनने चादर झाडाला बांधून आत्महत्या केल्याचे आढळून आले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी दिली. (Yerwada Police Station) काय आहे संपूर्ण प्रकरण - सचिन मधुकर नरवाडे (रा. तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) या 31 वर्षीय व्यक्तीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. आरोपी सचिन याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला होता आणि याच प्रकरणात त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सचिनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सचिनची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. गुरुवारी 7 जुलैला दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयीन कैद्यांना मोकळे सोडण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर त्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सचिन आढळून आला नाही. हेही वाचा -  PUBG Murder: मुलाचे ओठ Feviquick ने चिकटवले; हात-पाय बांधून खून आणि मृतदेह टॉयलेटमध्ये अधिक तपास केला असता आरोपी सचिनने बराक क्रमांक दोनच्या परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पुणे जिल्ह्यात महिलेचा सर्पदंशाने मृत्यू - पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात एका 20 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू (Sneke bite) झाला आहे. कोमल अजित तांबे (वय 20) असे या मृत तरुणीचे नाव आहे. (Young Married Woman Death due to Snake Bite) ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली नजीक तुकाईनगर गावात घडली. कोमल अजित तांबे ही विवाहित तरुणी आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात घरकाम करत होती. याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. ती आपल्या अंगणात घरकाम करत असताना तिला सर्पदंश झाला. यानंतर तिला लगेचच मोरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचार केल्यानंतर कोमलची प्रकृती जास्तच ढासळत चालली होती. यामुळे तिला अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात