पुणे, 10 सप्टेंबर : मागच्या 10 दिवसांपासून बाप्पाची आरास अगदी भक्तीभावात केल्यानंतर काल (दि. 09) गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. (Vasant More Ganesh Visarjan) काल सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणूका राज्यातील मुख्य शहरात अद्यापही सुरू आहेत. तब्बल 24 तास चालेल्या ह्या मिरवणुका किरकोळ कारणे सोडली तर अगदी भक्तीभावात निघाल्याने विघ्नहर्त्याला सर्वत्र भक्तिभावात निरोप देण्यात आला. दरम्यान पुण्यातील डॅशिंग व्यक्तीमत्व असलेले मनसे नेते वसंत मोरे आपल्या रावडी अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांनीही विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरत हजारो नेटकऱ्यांचे मन जिंकले. हृदयी वसंत फुलताना, जानू विना रंगच नाय, अशा गीतांवर वसंत मोरे थिरकले. त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत.
मागची 2 वर्षे कोरोनामुळे गणपतीच्या आगमनालाही आणि विसर्जनलाही डिजे किंवा पारंपारिक मिरवणुकांचा थाट पाहायला मिळालेला नव्हता. यंदा मात्र गणेश भक्तांनी मागच्या दोन वर्षातील थांबलेल्या मिरवणुकांची चांगलीच भरपाई करून घेतली. यामध्ये नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनीच आनंद लुटला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनाही त्यांचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला. हृदयी वसंत फुलताना, जानू विना रंगच नाय, अशा गीतांवर वसंत मोरे थिरकले. त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत.
हे ही वाचा : कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, ‘या’ बंडखोर माजी आमदारांच्या स्वागत कमानीजवळ आल्यावर लावले गाणे, मग पुढे…
मनसेचे नेते वसंत मोरे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत भाग घेत गणेश भक्तांच्या साथीने त्यांच्या सुरात सूर मिसळून भन्नाट डान्स केला. पारंपारिक वाद्यांवर ते थिरकलेच पण उडत्या चालीच्या गाण्यांवरही त्यांनी मनमुराद नृत्याचा आनंद लुटला. आपल्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावासाठी आणि रोखठोक वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे तात्यांच्या डान्सचा अंदाज सगळ्यांनाच भावला. कालच्या मिरवणुकीतल्या डान्सचे व्हिडीओ वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेत यावर अनेक नेटकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचसोबत मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळालं. जवळपास 11 तास मिरवणुका चालल्या.
हे ही वाचा : हे चित्र बरं दिसत नाही, पुढच्या वर्षी समुद्रात विसर्जन नको, अमित ठाकरेंचं आवाहन
पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे 4.15 मिनिटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन 8.02 वाजता झाले. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडी गणपतीचे विसर्जन रात्री 8.50 वाजता झालं. यावेळी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आले.