जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Milk Price Hike: शेतकऱ्यांना दिलासा तर ग्राहकांना झटका, दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये अन् विक्री दरात 2 रुपयांची वाढ

Milk Price Hike: शेतकऱ्यांना दिलासा तर ग्राहकांना झटका, दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये अन् विक्री दरात 2 रुपयांची वाढ

थंड दूध खरोखर वजन कमी करण्यास मदत करते. थंड दुधात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. अशा प्रकारे जास्त कॅलरीज बर्न होतात. एक ग्लास दूध प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास देखील मदत होते.

थंड दूध खरोखर वजन कमी करण्यास मदत करते. थंड दुधात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. अशा प्रकारे जास्त कॅलरीज बर्न होतात. एक ग्लास दूध प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास देखील मदत होते.

Milk Price hike in Maharashtra: दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कारण दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 16 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel price hike) झाली असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे जनता महागाईने होरपळली आहे. त्यातच आता दूध खरेदी करणंही महागलं (milk price hike in Maharashtra) आहे. कारण, राज्यभरात दूध खरेदी आणि विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक संघाने घेतला आहे. काय घेतला दरवाढीचा निर्णय? दूध पावडर आणि बटर यांचे दर वाढलेले आहेत. इंधन दरातही वाढ झाली आहे आणि पशूखाद्य देखील महागले आहे. त्यासोबतच दुधाची मागणी वाढली आहे आणि उत्पादन कमी झाले आहे. यामुळे दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये (Milk purchase price increase by Rs 3) तर विक्री दरात 2 रुपयांनी वाढ (Milk selling price increase by Rs 2) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा :  चोराने कॅफेमध्ये बसलेल्या तरुणीचा लॅपटॉप हिसकावला पण.., Shocking Video किती रुपयांनी महागले दूध? दूध उत्पादक संघाने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यात दूध खरेदी दरात 3 रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे. तर दूध विक्री दरात 2 रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध दर वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. मात्र, त्याच दरम्यान महागाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. वाचा :  नवी मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार आला समोर, NCP कडून चौकशीची मागणी या दूध दरवाढीचा फटका थेट ग्राहकांना बसू नये म्हणून दूध उत्पादक संघाने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विक्री कमिशन कमी करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्यावसायिकांना सोसावा लागणार आहे. यामुळे दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत झालेली इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ, दूध उत्पादनात झालेली घट, दूध पावडर आणि बटर यांच्या दरात झालेली वाढ या सर्वांमुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध व्यावसायिकांच्या उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात