मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

LIVE VIDEO : ‘मेरा भाई किधर है’, पुण्यातील पूरात अडकलेल्या बहिणीचा टाहो, रक्षाबंधनाच्या दिवशीच घडला भावुक प्रसंग

LIVE VIDEO : ‘मेरा भाई किधर है’, पुण्यातील पूरात अडकलेल्या बहिणीचा टाहो, रक्षाबंधनाच्या दिवशीच घडला भावुक प्रसंग

'मेरा भाई किधर है,' असा टाहो नदीपात्रात अडकलेल्या बहिणीनं केला.

'मेरा भाई किधर है,' असा टाहो नदीपात्रात अडकलेल्या बहिणीनं केला.

Pune Rain : पुण्यातील नदीपात्रात पालघरचे एक कुटंब मध्यरात्री अडकले होते. या कुटुंबातील मुलगी तिला बाहेर काढताच 'मेरा भाई किधर है' अशी सतत विचारणा करत होती.

पुणे, 12 ऑगस्ट : पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसानं मुठा नदीला पूर आला. नदीपात्रातील पाणी वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर एस.एम. जोशी पूलाखाली देखील मोठं पाणी साचलं होतं. या पाण्यात पालघरमधील एक कार वाहून गेली. या कारमध्ये पाच जण होते. या सर्वांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढले, पण यावेळी बहिणीनं आपल्या भावासाठी दिलेली हाक पाहून सर्वांचंचं मन हेलावलं.

काय घडला प्रसंग?

पुण्यात रात्री 1 वाजून 46 मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर एरऺडवणा केंद्राची मदत पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून टाटा टिगोरो (MH 48 6151) या गाडीजवळ जात गाडीमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं.

पालघरमधील लालवाणी कुटुंबीय या गाडीमध्ये होते. हे सर्व जण पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. ते रजपूत विटभट्टीकडून कारमध्ये पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत आत अडकलेल्या व्यक्तींची सुखरूप सुटका केली.

पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, अनेक वाहनं अडकली, अंगावर काटा आणणारे Live Video

मेरा भाई किधर है...

या कुटुंबातील वंचिकाला बचावपथकानं नदीपात्रातून बाहेर काढले. त्यावेळी वंचिकाला तिच्या भावाचीच काळजी होती. ‘मेरा भाई किधर है, मुझे उसके पास जाना है,’ असं ती सातत्यानं म्हणत होती.

बचावपथकानं वंचिकाचा लहान भाऊ कृष्णाची यापूर्वीच सुटका केली होती. एका कर्मचाऱ्याच्या कडेवर कृष्णा होता. आपला भाऊ सुखरूप आहे, हे पाहताच वंचिकानं सुटकेचा निश्वास सोडला. कृष्णालाही ताई समोर दिसताच आनंद झाला. हे दोघं बहिण-भाऊ एकमेकांना बिलगले. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण-भावाचे प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Live video, Pune, Pune rain