मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, अनेक वाहनं अडकली, अंगावर काटा आणणारे Live Video

पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, अनेक वाहनं अडकली, अंगावर काटा आणणारे Live Video

पुण्यात भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर तर पाणीच पाणी जमा झालंय. त्यामुळे पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.

पुणे, 11 ऑगस्ट : महाराष्ट्रात पुन्हा पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नागरिकांचे हाल झाले. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे पाठोपाठ पुण्यात आता पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर तर पाणीच पाणी जमा झालंय. त्यामुळे पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या गाड्या पाण्याबाहेर काढण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्नांच्या पराकष्ठा सुरु आहेत. अनेकांकडून दोर बांधून वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्या घडामोडींचे लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात तर पावसाची प्रचंड बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी 26 हजार 809 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचड हाल झाले. नदी पात्रात अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी चालकांची प्रचंड धावपळ झाली. दरम्यान नदी पात्रात पार्क केलेल्या काही गाड्या पाण्यात वाहून गेल्या. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात आला. प्रशासन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असंही सांगण्यात आलं आहे. (मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती) दुसरीकडे कोल्हापूरातील तुळशी धरण परिसरात आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने धरण ९३ टक्के भरले असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Pune, Rain flood

पुढील बातम्या