मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

TET परीक्षा घोटाळा: परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

TET परीक्षा घोटाळा: परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

TET examination paper leak case : महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे.

पुणे, 21 डिसेंबर : टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET exam paper leak case) पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने (Pune Police cyber cell) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आल्यावर आता आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Police arrest sukhdev dere former commissioner of state council examinations in TET exam paper leak case)

सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते, त्यानुसार डेरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बंगळुरू येथून एकजण ताब्यात

टीईटी 2018 परीक्षेत  झालेल्या घोटाळ्याप्रकरणी जी ए सॉफ्टवेअरच्या आणखी एका संचालकाला बंगळुरू येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी रात्री उशीरा ही कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तुकाराम सुपेंवर अखेर राज्य सरकारची कारवाई

टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने धडक कारवाई करत परीक्षा तुकाराम सुपेला निलंबित करण्यात आले आहे. शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपेला अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वाचा : म्हाडा भरतीच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं. त्यातच थेट धागे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्तापर्यंत पोहोचले. अखेर राज्य सरकारने त्याचं निलंबन केलं आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधी तुकाराम सुपे हे पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

आरोग्य भरती परीक्षा प्रकरणी बीडमधून एकाला अटक

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदाच्या पेपर फुटी प्रकरणी एका व्यक्तीला बीडमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय शाहूराव सानम याला बेड्या ठोकल्या आहेत. संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. संजय सानप हा बीड जिल्हा युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Examination, Pune