पुणे, 29 ऑगस्ट : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव काळातील काही दिवस पुण्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवश जिल्ह्यातील दारूची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
याशिवाय गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही विसर्जन असेल त्या भागातील दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. नियम मोडणाऱ्या दुकानांकडे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुठेही गैरप्रकार आढळल्यास अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Ganeshotsav 2022 : 10 दिवसानंतर का करतो बाप्पाचं विसर्जन? महाभारताशी जोडलेले आहे कारण
31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना गणेशोत्सवादरम्यान दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात दिलेल्या तारखांनुसार मद्यविक्रीची दुकानं, बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली असून ते शहरात तपासणी करतील अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Ganesh chaturthi, Pune