Home /News /maharashtra /

दिवसाढवळ्या दुकानात सराफ व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला, पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

दिवसाढवळ्या दुकानात सराफ व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला, पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

दुकानात कुणी येत नाही, याची संधी साधून बॅगेतून चाकू काढला आणि सराफावर हल्ला केला.

पुणे, २० मे - डोंबिवलीमध्ये (Dombivali) काही दिवसांपासून एका सराफावर दुकानात शिरून चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील (pune) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti University Police Station) हद्दीत दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीने सराफा व्यापाऱ्यांवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. हल्लेखोर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. बराच वेळ ते आतमध्ये बसलेला होता. दुकानात कुणी येत नाही, याची संधी साधून बॅगेतून चाकू काढला आणि सराफावर हल्ला केला. सराफाने मोठ्या हिंमतीने त्याचा हल्ला परतावून लावला. त्यांनी या चोराच्या हातातून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. सराफ व्यापा-याने जोरदार प्रतिकार केल्यामुळे चोरटा चांगलाच घाबरला आणि त्याने दुकानातून धूम ठोकली. पण याा झटापटीत सराफ व्यापाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. (रसाळ गोड आंब्यामुळे ओठांवर आणि आजूबाजूला फोड का येतात?) या प्रकरणी सराफा व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये चाकू हल्ला करणाऱ्या अरोपीविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या