नाशिक 9 ऑगस्ट : नाशिक शहर ( Nashik city ) जितकं धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तितकच खवय्यांच माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कारण नाशिक शहरात अनेक खाद्य पदार्थ फेमस आहेत. त्यातीलच एक रविवार कारंजा वरील चिराग व्हेज बिर्याणी (Special Chirag Veg Biryani) प्रसिद्ध आहे. ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. चला तर या व्हेज बिर्याणी बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
चिराग व्हेज बिर्याणीची सुरुवात सुभान अली यांनी 9 वर्षांपूर्वी केली होती. तर आतापर्यंत या व्हेज बिर्याणीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून ग्राहक या ठिकाणी व्हेज बिर्याणी खाण्यासाठी येत असतात. स्वतः घरगुती मसाल्यामध्ये ही व्हेज बिर्याणी बनवल्या जाते. त्यामुळे अधिक ग्राहक ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी पसंद करतात.
हेही वाचा- Beed : बीडमध्ये बनते कच्छची फेमस दाबेली; एकदा खाल तर खातच राहाल, VIDEO
चिराग बिर्याणीची काय आहे खासियत ?
तीन प्रकारच्या बिर्याणी मिळतात. व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, पनीर टिक्का बिर्याणी ही बिर्याणी तुम्ही एकदा खाल्ली की खुश व्हाल कारण चविष्ट आणि अप्रतिम अशी ही बिर्याणी आहे. बिर्याणी बनवण्यासाठी सुभान अली बाहेरून मसाले आणत नाहीत ते स्वतः घरगुती मसाले तयार करून वापरतात. तांदूळ देखील उत्तम प्रतीचा वापरतात. त्यामुळे बिर्याणी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही किंवा पोटात जळजळ देखील होणार नाही. त्यामुळे अधिक ग्राहक या बिर्याणीकडे आकर्षित होतात.
40 रुपयात फुल प्लेट बिर्याणी
ग्राहकांना बिर्याणीचा आस्वाद घेता यावा या करिता 40 रुपयात फुल प्लेट बिर्याणी आम्ही देतो. एक प्लेट खाल्ली की तुमचं पोट भरून जातं. तस इतर ठिकाणी पोटभर खायचं म्हणजे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात आणि एखादा खूपच गरीब व्यक्ती असेल ज्याच्याकडे पैसे नसतील अशा व्यक्तीला आम्ही मोफत बिर्याणी देऊन टाकतो असं, चिराग व्हेज बिर्याणीचे सुभान अली सांगतात.
गुगल मॅप वरून साभार
हेही वाचा- Osmanabad : उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी
कुठे आहे चिराग व्हेज बिर्याणी?
नाशिक शहरात 5 ठिकाणी चिराग व्हेज बिर्याणीच्या शाखा आहेत. जुने सीबीएस परिसर, भद्रकाली, रविवार कारंजा, उत्तमनगर, नाशिकरोड, या ठिकाणी आहेत. तुम्ही कोणत्याही शाखेत गेलात तरी बिर्याणीची चव एकच असेल उत्तम प्रतीचीच बिर्याणी तुम्हाला इथं खायला मिळेल. बिर्याणी तुम्हाला पार्सल देखील मिळू शकते. या 8975990920 नंबर वर तुम्ही अधिक चौकशी करू शकता.
अशी बिर्याणी कुठेच नाही खाल्ली
बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते सध्या तर प्रत्येक हॉटेल मध्ये बिर्याणी मिळते. मात्र, अशी बिर्याणी कुठेच नाही मिळत, असं ग्राहक फैजल सांगतात. पुढे बोलताना ते म्हणतात की, इथली बिर्याणी एकदा खाल्ली की खावीशीच वाटते कारण या बिर्याणीमुळे कोणताही त्रास होत नाही. मसाले चांगले असतात. एक प्लेट खाल्ली की पोट भरत त्यामुळे मी तर आठ दिवसात एकदा येतोच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.