मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विनायक मेटेंच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार? पुण्यात होणार घोषणा?

विनायक मेटेंच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार? पुण्यात होणार घोषणा?

Jyoti Mete : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आज पुण्यात शिवसंग्रामची पहिलीच राज्य स्तरीय कार्यकारीणी बैठक होत आहे. यामध्ये डॉ. ज्योती मेटे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

चंद्रकांत फुंदे, पुणे.

पुणे, 6 सप्टेंबर : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं नुकतंच अपघाती निधन झालं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून लढा देणाऱ्या विनायक मेटेंच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त झाली. मेटे यांच्या अकाली निधनाने कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. अशातच शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकारिणीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीत मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे देखील होत्या.

शिवसंग्रामच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

विनायम मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांचं जाळ विणलं आहे. मात्र, मेटे यांच्या निधनाने पक्षसंघटनेचं पुढे काय होणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या पार्श्वभूमीवर 19 ऑगस्टला गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ. ज्योती मेटे यांनी यापुढे पक्षाचं नेतृत्व करावं, तसंच भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केली आहे. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आज पुण्यात शिवसंग्रामची पहिलीच राज्य स्तरीय कार्यकारीणी बैठक पार पडली. त्याला ज्योती मेटे यांची विशेष उपस्थिती आहे. शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार? याबाबतची घोषणा बैठकीत होण्याची शक्यता आहे.

वाचा - 'बारामतीचा पुढचा खासदार सेना-भाजप युतीचा', बावनकुळेंचं काटेवाडीतून थेट सुळेंना चॅलेंज

नेमकं काय आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं?

सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेल्या विनायक मेटे यांनी पुढे शिवसंग्राम या आपल्या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. मेटे यांच्या शिवसंग्रामने महायुतीद्वारे भाजपला आपला पाठिंबा दिला होता. भाजपच्या मदतीने ते विधानपरिषदेवरही गेले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे मेटे यांना 'सरप्राइज गिफ्ट' दिलं जाईल, असं म्हणत भाजप नेतृत्वाने त्यांना पुन्हा विधानपरिषद आमदार म्हणून संधी देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने विनायक मेटे यांना दिलेलं आश्वासन त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विधानपरिषदेवर घेऊन पूर्ण करावं, अशी मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

First published:

Tags: Pune, Vinayak mete