बारामती, 06 सप्टेंबर : ‘राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. पुढच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन विधानसभेत आणि लोकसभेत करायचे आहे. पुढचा खासदार हा भाजप आणि सेनेचा खासदार होणार आहे’, अशी गर्जनाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी बारामतीत (baramati) केली आहे. भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामतीत आले होते. यावेळी बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘काटेवाडीत जेव्हा कोणतीही निवडणूक येईल तेव्हा भाजपचे कमळ दिसेल असं मला कार्यकर्त्यांनी सांगितले. राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. पुढच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन विधानसभेत आणि लोकसभेत करायचे आहे. 2024 साली जर यांचं विसर्जन केलं तर इथं उपस्थित असलेल्यापैकी पदावर जाईल. जर बारामतीत तुम्ही विसर्जन केले तर राज्यात परिवर्तन होईल, असं बावनकुळे म्हणाले. ( शिवसेना Vs शिंदे गटाची लढाई निर्णयाक टप्प्यावर, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी ) पुढच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन विधानसभेत आणि लोकसभेत करायचे आहे. पुढचा खासदार हा भाजप आणि सेनेचा खासदार होणार आहे. नकली शिवसेना नाही. असली शिवसेना जी हिंदुत्ववादी आहे. पवार साहेबांना नकली शिवसेना हवी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येणारी शिवसेना पवारांना हवी आहे, असंही बावनकुळे म्हणाले. मराठा आरक्षण देण्याच काम फडणवीस यांनी केलं. आता राजकारण करतील.. मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय? असं विचारतील तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. परंतु, तुमचं सरकार असताना का नियोजन केलं नाही. ओबीसी आरक्षनाबाबत हेच केलं. महाविकास आघाडीच्या सरकारला ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. परंतु, ओबीसी आरक्षण शिंदे फडणवीस सरकारने दिलं, असंही बावनकुळे म्हणाले. ‘18 तारखेला निर्मला सीतारमण या बारामती लोकसभेच्या प्रभारी असतील. 22 ते 24 असा निर्मला सीतारमण दौरा करणार आहे. जेव्हा 24 तारखेला निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद होईल तेव्हा अर्धा मतदार संघ जिंकलेला असेल. इथल्या कार्यकर्त्यांला अधिकाऱ्यांचा त्रास होत असेल तर फडणवीस यांच्या कानावर घालणार आणि कार्यकर्त्यांचा त्रास दूर करणार, असंही बावनकुळे म्हणाले. (शिंदे गटाकडून विदर्भातील जिल्हा प्रमुखांची घोषणा; मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात होणार मोठा राजकीय धमाका?) ‘3 महिन्यातून एकदा मी बारामतीत येणार आहे. जर 2024 ला आपण जिंकलो नाहीतर आपण अनेक वर्षे आपण दूर राहू. त्यामुळे बारामतीत मोदींची सभा होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. बोगस मतदान करून साखर कारखाने ताब्यात ठेवले आहे. जेवढं नागपूरवर लक्ष राहिल तेवढंच बारामतीवर राहील. केंद्रीय रस्त्यावर हे स्वतःचे फोटो असलेलं फ्लेक्स लावत आहेत. बारामतीत जेवढी काम सुरू आहेत तेवढ्या रस्त्यांची कामांचे उद्घाटन हे नितीन गडकरींच्या हस्ते करण्याची विनंती करणार आहे. 2024 ची निवडणूक ही 1 लाखापेक्षा जास्त मताने जिंकू शकतो, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.