पुणे, 18 जून : लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (indurikar maharaj) आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. इंदोरीकर महाराज यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण आता कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि युट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका आहे. प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम करू नका, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना सुनावले.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन पार पडलं. यावेळी इंदोरीकर महाराज यांचं वेगळंच रुप पाहण्यास मिळालं.
कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना सुनावले pic.twitter.com/RFybYeOslc
— News18Lokmat (@News18lokmat) June 18, 2022
वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. कीर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराज मोबाईल आणि युट्यूब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम केलं जात आहे, असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना मोबाईल बंद करण्याचा सल्लाच दिला.
(परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही; महिलेनं वयाच्या 53 वर्षी केली 'दसवीं')
' माझ्या किर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो' असंही इंदोोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात म्हटलं.
काय म्हणाले इंदोरीकर महाराज?
'आमचं आधी नीट समजून घेत जा, नाहीतर त्याचीच क्लिप व्हायरल कराल, इंदोरीकर महाराज वादग्रस्त विधान करून मोकळे झाले. अरे जरा भानावर राहत जा, महाराजांना काय म्हणताय त्यांचंही मत जाणून घेत जा, उगाच टीआरपीसाठी दुसऱ्यांच्या इज्जती घालवू नका. अर्थ जरा समजून घेत जा, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.