Home /News /career /

परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही; महिलेनं वयाच्या 53 वर्षी पूर्ण केली 'दसवीं', वाचा खडतर प्रवास

परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही; महिलेनं वयाच्या 53 वर्षी पूर्ण केली 'दसवीं', वाचा खडतर प्रवास

अनेक लोक असे असतात ज्यांना शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीपुढे माघार घ्यावी लागते. मात्र, म्हणून ते जिद्द सोडत नाहीत. सध्या अशाच एका महिलेची कहाणी तिच्या प्रसाद जांबले नावाच्या मुलाने Linkedin वर शेअर केली आहे

    मुंबई 18 जून : माणूस आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. त्यामुळे शिक्षण कितीही घेतलं तरी कमीच आहे, असं म्हटलं जातं. मात्र अनेक लोक असे असतात ज्यांना शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीपुढे माघार घ्यावी लागते. मात्र, म्हणून ते जिद्द सोडत नाहीत. सध्या अशाच एका महिलेची कहाणी तिच्या प्रसाद जांबले नावाच्या मुलाने Linkedin वर शेअर केली आहे. जी वाचून तुम्हालाही महिलेच्या जिद्दीचं कौतुक वाटेल (53 Years old Woman Clears SSC Exam). तरुणाने पोस्टमध्ये काय लिहिलं? माझी आई शाळा सोडल्याच्या 37 वर्षांनंतर दहावीची परीक्षा पास झाली. तर या कथेची सुरुवात तेव्हापासून होते, जेव्हा ती 16 वर्षांची होती आणि अचानक तिच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या भावंडांना शिक्षण घेता यावं, यासाठी आईने स्वतःचं शिक्षण सोडलं आणि आर्थिक संकटामुळे ती पैसे कमवण्यासाठी काम करू लागली. MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? 'हे' आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स आता मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये माझी आई एका सरकारी शाळेमध्ये कामासाठी गेली होती. तिथे एका शिक्षिकेनं तिला तिच्या शिक्षणाबद्दल विचारलं. माझ्या आईने दहावीचं शिक्षण मध्येच सोडल्याचं समजताच शिक्षिकेनं तिला नवीन सरकारी योजनेबद्दल सांगितलं. ज्यात सरकार अशा लोकांना आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतं, ज्यांना काही कारणास्तव मध्येच शिक्षण सोडावं लागलं. यासाठी लागणारी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासची फी तसंच अभ्यासासाठी लागणारं साहित्यही सरकार मोफत उपलब्ध करून देतं. या लिंकवर क्लिक करून तुम्ही पोस्ट वाचू शकता  याबद्दल समजताच माझ्या आईने डिसेंबर २०२१ पासून पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केली. मात्र, तिने ही गोष्ट गुपितच ठेवली. पुढे या तरुणाने लिहिलं, 'मी आयर्लंडमध्ये राहात असल्याने मला या सगळ्याबद्दल तेव्हा समजलं जेव्हा माझं लग्न तिच्या परीक्षेच्या नेमकं आधी आलं. जेव्हा मी आयर्लंडमध्ये होतो आणि भारतीय वेळेप्रमाणे रात्री घरी फोन करायचो तेव्हा मी विचारायचो की आई कुठे आहे? आणि मला सांगण्यात यायचं की ती फिरायला गेली आहे. मला वाटले की तिला चालण्याची आवड असेल. ती नाईट स्कूलसाठी जाते हे मला फारसं माहीत नव्हतं. एकाच छताखाली राहणाऱ्या माझ्या वडील आणि भावापासूनही तिने हे रहस्य महिनाभर लपवून ठेवलं होतं.' तिचा दिवस दहावीच्या अभ्यासक्रमातील धडे शिकण्यापासून सुरू व्हायचा. एके दिवशी मी भारतात परतल्यावर तिने मला तिची वही दाखवली आणि ती बीजगणित आणि इंग्रजीमध्ये किती चांगली आहे हे पाहून मी थक्क झालो. तिने मला फोटो देखील दाखवले की तिच्याप्रमाणेच शिक्षण सोडलेल्या लोकांना गट किती आनंदाने आता शिक्षण पूर्ण करत आहे. MH BOARD SSC RESULT: अपयश आलं म्हणून खचू नका; अजून एक संधी; पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर पुढे मुलाने लिहिलं की 'इतक्या वर्षांनंतरही ती वेगवेगळं ज्ञान आत्मसात करू शकली आणि इतकंच नाही तर ती तिच्या बॅचमधली हुशार विद्यार्थिनी होती. तिची परीक्षा मार्चमध्ये होती आणि माझं लग्न फेब्रुवारीमध्ये होतं. मात्र असं असतानाही तिने आवश्यक ते सर्व मल्टीटास्किंग केलं आणि दोन्ही कामं अगदी सहज हाताळली. प्रसाद जांबलेंनी पुढे लिहिलं, टआता दहावीचा निकाल समोर आला असून ती फरक्त पास झाली नाही, तर 79.60 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे. कधीकधी मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मला कशाचीही काळजी करण्याची गरज नव्हती आणि मला मिळालेल्या सर्व सुविधांमुळे मला या पदापर्यंत पोहोचता आलं. आईलाही माझ्याप्रमाणेच सुविधा मिळाल्या असत्या तर ती आज कुठे असती?. मला माझ्या आईचा नेहमीच अभिमान वाटतो आणि आता ही गोष्ट माझ्या मनात नेहमीच एक धडा म्हणून राहील की शिकणं कधीच थांबवू नका. जरी तुम्हाला दहावीची परीक्षा पास व्हायला वयाची 53 वर्ष लागली तरीही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Education, Inspiring story, Ssc board, Success story

    पुढील बातम्या