औरंगाबाद, 05 ऑगस्ट : सुंदर दिसण्यासाठी मुले आणि मुली चेहऱ्याची, केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करतात किंवा काहीजण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आपल्या त्वचेची काळजी घेतात. मात्र, सध्याच्या घडीला ब्युटी पार्लर ( Beauty Parlour ) मध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ब्युटी पार्लरची बाजारपेठ गेल्या काही वर्षांत झपाट्यानं वाढली असून यामध्ये महिला प्रामुख्याने स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करताना दिसत आहेत. औरंगाबाद ( aurangabad city ) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये राहणाऱ्या प्रीती जाधव यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करत स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु केला असून सध्या त्या इतर महिलांनाही व्यवसायचे धडे देत आहेत. प्रीती जाधव यांच्या आई-वडिलांकडे आर्थिक परिस्थिती नाजूक या दोन बहिणी दोन भाऊ असा परिवार यामुळे अठराव्या वर्षीच घरच्यांनी लग्न करून दिलं. घरामध्ये सासू-सासरे पती-पत्नी आणि त्यानंतर तीन मुले झाली. पती वाळूज परिसरामध्ये एका कंपनीत कामाला. घरात खाणारी तोंड 7 आणि कमावणारे व्यक्ती एक असल्यामुळे आर्थिक अडचण जाणवू लागली. यातच बँकेकडून लोन काढून घर घेतलं. कमावणारा व्यक्ती एकच असल्याने घर खर्च आणि बँकेचे हप्ते फेडणे कठीण जाऊ लागलं. यामुळे आम्ही आर्थिक, मानसिकरित्या खचलो होतो. घर कसं चालवावे आणि हप्ते कसे फेडावे असा प्रश्न आमच्या समोर उभा होता. यावर पर्याय शोधत घरी कटलरी दुकान चालू करण्याचा आम्ही पती-पत्नीने ठरवलं. यासाठी पन्नास हजार रुपये खर्च करून आम्ही कटलरीचे दुकान सुरू केलं. मात्र, त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही. यामुळे आमचं त्यामध्ये नुकसान झालं. यामुळे ब्युटी पार्लरचे शिक्षण घेतले व ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला, असे प्रीती जाधव सांगतात.
हेही वाचा : आता घरबसल्या काढा Learning Driving License, Video पाहा आणि कामाला लागा!
असा सुरु केला व्यवसाय एक दिवस टीव्ही सेंटर भागामध्ये राहणाऱ्या बहिणीने भेटायला बोलावलं आम्ही पती-पत्नी त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी ती तिच्या घरी ब्युटी पार्लर चालवत होती. यावेळी तिच्याकडे काही महिला व मुली होती ती त्यांना शिकवत देखील होती. त्यामुळे तिला विचारलं की काय करतेस तिने सांगितलं की शासन योजनेच्या अंतर्गत मी काही महिलांचा कोर्स घेते. तेव्हाच मलाही शिकव असं तिला म्हटल्यानंतर तिने लगेचच होकार दिला व तिने मला शिकवायला सुरुवात केली. तीन महिने मी तिच्याकडे शिकले त्यानंतर मी तिच्याकडेच काही दिवस सराव देखील केला. त्यानंतर जनशिक्षण संस्था व बहिणीच्या मदतीने मी स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय वाळूज परिसरामध्ये सुरू केला. या ठिकाणी सुरू केलेल्या ब्युटी पार्लर व्यवसायला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आणि यातून आमच्या आर्थिक अडचणी दूर होत गेल्या. मी महिन्याला किमान 25 ते 30 हजार रुपये कमावत असून वर्षाकाठी मला 3 लाखापेक्षा जास्त पैसे मिळतात असे प्रीती जाधव यांनी सांगितले. आता देतात ब्युटी पार्लरचे धडे मी ज्या वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये राहते त्या ठिकाणी माझ्यासारख्या अनेक महिला आर्थिक अडचणीमध्ये आहेत. त्यांना कंपनीत काम केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, कंपनीमध्ये चांगले वाईट अनुभव येतात त्यामुळे अनेक महिला काम करू शकत नाहीत. यावर पर्याय शोधून स्वतः त्यांना ब्युटी पार्लर शिकवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मी कोर्स देखील सुरू केले. गेल्या पाच वर्षांमध्ये मी 400 ते 500 महिला व मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवला. यातील अनेक महिलांनी स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला आहे असेही त्या सांगतात. हेही वाचा :
Aurangabad : News18 Local च्या बातमीचा दणका; BAMU मधील बंद कँटीन सुरु, पाहा VIDEO वाळूज परिसरात दोन शाखा सुरू वाळूज परिसरामध्ये प्रीती जाधव यांनी दोन शाखा सुरू केल्या आहेत. या शाखांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींना त्या रोजगार उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्हालाही ब्युटी पार्लर कोर्स संदर्भात अधिक माहिती घ्यायची असेल तर R6Q9+FWH, पवन नगर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज औरंगाबाद, महाराष्ट्र 431133 या पत्त्यावर भेट देऊ शकता. अधिक माहितीसाठी 93598 67206 या नंबरवर संपर्क साधू शकतात.
येथेच शिकले रोजगारही मिळाला मी गृहिणी आहे मला देखील स्वतःच्या पायावर उभा राहायचं होतं. माझं स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याचा माझा निर्णय होता. यासाठी मी प्रीती जाधव यांच्याकडे ब्युटी पार्लरचे शिक्षण घेण्यासाठी आले त्यांनी माझे पार्लरचे क्लासेस घेतल्यामुळे मला सर्व गोष्टी येत आहेत आता मी त्यांच्याकडेच रोजगार देखील मिळवत आहे, अशी प्रतिकिया प्रशिक्षणार्थी निकिता शिरसाठ यांनी दिली आहे.