मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चक्क रोबो करतात गणपतीची आरती! पाहा पुण्यातील हायटेक बाप्पा, VIDEO

चक्क रोबो करतात गणपतीची आरती! पाहा पुण्यातील हायटेक बाप्पा, VIDEO

X
गणपती

गणपती बाप्पाची आरती चक्क माणसं नाही तर चक्क रोबो करतात

पुण्यातील एका दाम्पत्याने त्यांच्या घरी हायटेक बाप्पा बसवला (Hi-Tech Bappa) असून त्याची रोबोटच्या मदतीने आरती (Bappa's Aarti using a robot) केली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे, 7 सप्टेंबर :सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाचे स्वागत दमदार पद्धतीनं करण्याचा प्रत्येक गणेश मंडळाचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर घरोघरी देखील लाडक्या बाप्पाचे मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदाने स्वागत केले जाते. बाप्पाच्या स्वागताबरोबरच बाप्पासाठी आकर्षक सजावट करण्याचा गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणेच अगदी घरगुती गणपती बाप्पासाठी खास सजावट करण्यात येते. बाप्पाच्या सजावटीचे देखावे करण्यात पुणेकर आघाडीवर आहेत. पुण्यातील एका दाम्पत्याने त्याच्या घरी हायटेक बाप्पा बसवला (Hi-Tech Bappa) असून त्याची रोबोटच्या मदतीने आरती  (Bappa's Aarti using a robot) केली जाते.

    काय आहे संकल्पना?

    पुण्यातील तेजस सोनवणे आणि सारिका सोनवणे या दाम्पत्याने एक अनोखी कल्पना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केली आहे. या दोघांनी मिळून हे रोबोट तयार केले आहेत. याच्या मदतीने चक्क गणपती बाप्पाची आरती केली जाते. एक रोबोच्या हातामध्ये आरतीचे ताट असते. तर दुसरा रोबो  घंटेचा निनाद करताना पाहायला मिळतो. नियमित अंतर ठेवून हे दोन्ही रोबो बाप्पा समोर आरती करतात.

    Ganeshotsav 2022 : पुण्यातील मेट्रो कशी असेल? 'या' देखाव्यातून येईल आयडिया Video

    सोनावणे दाम्पत्य वारजे भागात असणाऱ्या त्यांच्या घरात दोन्ही रोबोट कडून बाप्पाची दररोज नियमित आरती केली जाते.

    इंजिनीयर असलेल्या तेजस यांची रोबो तयार करण्याची कंपनी आहे. तंत्रज्ञानाचा वापर अनोख्या गोष्टीसाठी करावा तसेच काहीतरी कल्पक आणि नवीन हा करण्याचा ध्यास असल्यामुळे तेजस यांनी दोन रोबो तयार केले. यात त्यांना जपानी कंपनी फनूक इंडिया यांची देखील मदत लाभली.

    गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञान वाढत चालला आहे मात्र काही लोक अजूनही या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत नाहीत. संस्कृती आणि तंत्रज्ञान या दोन्हीची सांगड घालत तेजस आणि सारिका यांनी एक उत्तम उदाहरण तयार केल आहे.

    आय.आर.टी.एस. या कंपनीद्वारा हे रोबो बनवले असून इंडस्ट्रीयलीज रोबट्रिक्स आणि ऑटोमेशन या विषयातील तेजस तज्ज्ञ आहेत.

    गुगल मॅप वरून साभार

    First published:
    top videos

      Tags: Ganesh chaturthi, Pune, Robot