पुणे, 18 ऑक्टोबर : पुण्यात परतीच्या पावसाने मध्यरात्री अक्षरश: हैदास घातला. सर्वत्र विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. मंदिरापासूने ते रेल्वे स्टेशन परिसरात पाणीच पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण 12 जणांची सुखरुप सुटका केली. राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील बसला. सोमवारी रात्री नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं.
#punerains पुण्यात मध्यरात्री तुफान पाऊस pic.twitter.com/ZwUx6m9UdP
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2022
पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदाआनंदनगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली. (मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कंटेनरचा ब्रेक फेल; अपघाताचा थरार मोबाइलमध्ये कैद, Exclusive Video) दरम्यान, पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.
10.45 pm, #PuneRain in last 3 hrs...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 17, 2022
Hadapasar 61, Wagagaosheri 58 mm
Many other places its between 40-50 mm include Shivaji Nagar too.
Very intense, 🌧🌧🌧
Severe thunder and lightning...🌩🌩
Don't even think of going out pl.🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/UC7kGVrwkt
दरम्यान, पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकूण 20 (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ - सुखसागर नगर, अंबामाता मंदिर - कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड - रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ - सुखसागर नगर, डॉल्फिन चौक - बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर - हडपसर, गाडीतळ - शिवाजीनगर पोलिस मुख्यालय - मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम - कसबा पेठ, फिश मार्केट जवळ - कुंभार वाडा समोर - नारायण पेठ, मोदी गणपती - औंध, डिएव्ही स्कुल गल्ली - कसबा पेठ, पवळे चौक - कसबा पेठ, भुतडा निवास - पर्वती, मिञमंडळ चौक - गंज पेठ - भवानी पेठ तसंच ०१ ठिकाणी सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली. (Weather Alert : राज्यात तुफान बरसणार, मुंबईसह या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा) पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामध्ये दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते. कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामध्ये जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.