गणेश दुडम/ पुणे, 16 ऑक्टोबर : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर आज पावणे चार वाजता एक थरार बघायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या मनात धडकी भरली. भल्या मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणं अवघड होतं. चालक पुरता घाबरला होता. एकतर समोरच्या गाडीला धडक किंवा घाटात गाडी जाणार हे नक्की होतं. मात्र त्या कठीण काळातही चालकाने क्लृप्ती लढवली. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला धडक दिल्यावर ही चालकाने शिताफीने कंटेनरवर ताबा मिळविला.
पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या मनात धडकी भरली. भल्या मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणं अवघड होतं. pic.twitter.com/lVjpO8udZV
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2022
यात तो जखमी झाला. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार एका वाहन चालकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.