पुणे, 14 सप्टेंबर: गेल्या 4-5 दिवसांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी राज्यात सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज पाच जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची (heavy rainfall alert) शक्यता आहे. पण उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झाल्यानं मागील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. महाराष्ट्रासोबत गुजरातमध्येही पावसानं धूमशान घातलं आहे. त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-Explainer - दोन डोसनंतर तिसरा डोस; कोरोनाचा Booster dose फायद्याचा ठरेल?
आज राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. पुढील चोवीस तासांत पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी आकाशात विजा चमकण्याचं प्रमाण अधिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा-लहान मुलांमध्ये दीर्घकाळ राहतोय कोरोना विषाणू? संशोधनातून चिंताजनक माहिती समोर
2 दिवस पुण्यात मुसळधार पाऊस
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. उद्या राज्यातून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. उद्या फक्त नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र