जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात राजकीय राडा, गाडीवर हल्ला झाल्यानंतर समोर आली उदय सामंत यांची Health Update

पुण्यात राजकीय राडा, गाडीवर हल्ला झाल्यानंतर समोर आली उदय सामंत यांची Health Update

पुण्यात राजकीय राडा, गाडीवर हल्ला झाल्यानंतर समोर आली उदय सामंत यांची Health Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 2 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्यात राजकीय राडा झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. परिस्थिता हाताबाहेर जायच्या आधीच पोलिसांनी नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते या हल्ल्यातून सुखरुप बचावले आहेत. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.

जाहिरात

नेमकं काय घडलं? उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. इथल्या चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्ला केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात