मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ससून रुग्णालयात गोळीबार आणि चालल्या तलवारी, कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला, पुणे हादरलं

ससून रुग्णालयात गोळीबार आणि चालल्या तलवारी, कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला, पुणे हादरलं

 कैदी वॅार्डमध्ये सोमवारी रात्री हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

कैदी वॅार्डमध्ये सोमवारी रात्री हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

कैदी वॅार्डमध्ये सोमवारी रात्री हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 06 सप्टेंबर : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील ससून रूग्णालयाच्या कैदी वॅार्डमध्ये सोमवारी रात्री हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेले काही वर्ष तो तुरूंगात आहे मात्र दहा दिवसांपूर्वीच त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात कैदी वॅार्डमध्ये हलवण्यात आलं होतं. सोमवारी रात्री नातेवाईक असल्याचं भासवून दोन जण कैदी वॅार्डमध्ये शिरले आणि हंबीर यांच्यावर गोळीबार केला आणि सोबत आणलेल्या तलवारी ने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी अमोल बागड यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे मात्र अजून हल्लेखोरांना पोलीस पकडू शकलेले नाहीत. दुसरीकडे ससून रूग्णालयाच्या सुरक्षेच्या जबाबदारीत ही बंडगार्डन पोलीस अपयशी ठरले आहे.

(परभणी हादरलं, मनसे शहराध्यक्षाची चाकूने सपासप वार करून हत्या)

गुंड तुषार हंबीर याच्यावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही 2019 मध्ये येरवडा कारागृहात  कैद्यांच्या झालेल्या हाणामारीत हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक व सराईत गुन्हेगार तुषार हंबीर गंभीर जखमी झाला होता. हंबीर हा मोहसीन शेख खूनातला आरोपी आहे.  तीन मुस्लिम कैद्यांनी हंबीरवर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी शाहरुख उर्फ राशिद शेख, अमान रियाज अंसारी आणि सलीम शेख या तिघांना हंबीरवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी अटक केली होती. या तिघांनी दगड आणि खिळ्यांनी हंबीरवर वार केले होते.

First published: