सीतामढी (बिहार), 7 जून : बिहार राज्यातील सीतामढी
(Sitamarhi) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष देवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
(Sexual Assault) करण्यात आले आहे. ही घटना बेलसंड पोलीस ठाणे परिसरातील आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीसोबत शोषण केल्यानंतर आणखी धक्कादायक कृत्य केले.
काय आहे घटना -
लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच त्यांनी लग्नाचा दबाव टाकून पीडित मुलीचा अश्लिल व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल देखील करुन टाकले. याप्रकरणी पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी बेलसंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर कंसार पंचायतीचे प्रमुख मोहम्मद आलमगीर आणि त्याचा भाऊ मोहम्मद जाहिदसह एका महिलेला याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.
आरोपींनी पीडितेचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या संतापजनक घटनेमुळे पीडितेचे संपूर्ण कुटुंब घाबरले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे पीडितेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर आरोपींनी तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचीही माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद आलमगीर यांनी अल्पवयीन मुलीच्या आईलादेखील मारहाण केली. तसेच आपल्या बळाचा वापर करुन तो या प्रकरणाच्या तपासातही दखल देत आहे. पोलिसात पीडितेने तक्रार दिल्यानंतर तिच्यासह कुटुंबीयांना सातत्याने धमकी दिली जात आहे.
हेही वाचा - Moose Wala Murder Case: सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील नवीन Video समोर, CCTV फुटेजमध्ये दिसले शूटर्स
तर याच प्रकरणात आणखी एक संवेदनाहीन बाबही समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय चाचणीसाठी कोणतेच वाहन उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे पीडितेला स्वत: भाड्याच्या गाडीने न्यायालय आणि संबंधित रुग्णालयात जावे लागले. दरम्यान, बेलसंड पोलीस ठाण्याचे अधिकारी कलेक्टर सिंह यांनी सांगितले आहे की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पीडित मुलीला न्याय मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.