मराठी बातम्या /बातम्या /देश /

गडकरी आऊट, फडणवीस इन! भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय?

गडकरी आऊट, फडणवीस इन! भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय?

Nitin Gadkari Devendra Fadnavis

Nitin Gadkari Devendra Fadnavis

भाजपचे (BJP Committee) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : भाजपचे (BJP Committee) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या समितीमध्ये आता एकही मराठी माणूस नाही. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय समितीतील नावं पुढील प्रमाणे... जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित भाई शाह बी. एस. येदयुरप्पा सर्बानंद सोनोवाल के. लक्ष्मण इकबाल सिंह लालपुरा सुधा यादव सत्यनारायण जटिया बी एल संतोष (सचिव) यासोबतच भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी केंद्रीय निवडणूक समितीच्या १५ सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. या समितीतून देखील नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपची निवडणूक समिती जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित भाई शाह बी. एस. येदयुरप्पा सर्बानंद सोनोवाल के. लक्ष्मण इकबाल सिंह लालपुरा सुधा यादव सत्यनारायण जटिया भूपेन्द्र यादव देवेन्द्र फडणवीस ओम माथुर बीएल संतोष (सचिव) वनथी श्रीनिवास संसदीय समितीचं काम भाजपची संसदीय समिती ही पक्षातली सगळ्यात महत्त्वाची समिती आहे. राज्यांमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात कुणाशी युती करायची, याचा निर्णय ही समिती घेते. तसंच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये आणि विधान परिषदांमध्ये पक्षाचा नेता निवडीचं काम ही समिती करते. निवडणूक समितीचं काम निवडणूक समितीला भाजपमध्ये संसदीय समितीनंतरचं दुसरं महत्त्वाचं स्थान आहे. ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तिकीट वाटपाचे निर्णय घेतात. तसंच प्रत्यक्ष निवडणुकीत कुणाला उतरवायचं आणि पक्ष संघटनेचं काम कुणाला द्यायचं, हे निर्णय निवडणूक समिती घेते.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Nitin gadkari

पुढील बातम्या