पुणे 13 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ( Swatantracha Amrut Mahotsav ) वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा अभियान ( Har Ghar Tiranga Abhiyan ) मोठया उत्साहात राबविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळत आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील दिव्यांग नागरिक असलेले रफिक शेख ( Rafiq Shaikh) यांनी आपल्या घराच्या 75 पायऱ्या हाताने चढून आपल्या घरावर 75 फुट उंच तिरंगा फडकवला आहे. पुण्यात राहणारे रफिक शेख हे जन्मताच दिव्यांग आहेत ते व्हीलचेअर शिवाय कुठेही प्रवास करू शकत नाही. मात्र, भारत देशाच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या घराच्या 75 पायऱ्या चढून 75 फूट उंच तिरंगा फडकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारत वासियांना हर घर तिरंगा या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. यालाच प्रतिसाद म्हणून मी हा तिरंगा माझ्या घरावरती फडकवला आहे. असं यावेळी दिव्यांग नागरिक रफिक शेख यांनी सांगितले. हेही वाचा : Aurangabad : कौतुकास्पद! साडेसहा वर्षांच्या कबीरनं साडेतीन तासांमध्ये केले कळसुबाई सर, VIDEO तिरंगा फडकवने ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी आनंदाची गोष्ट हा तिरंगा फडकवण्यासाठी त्यांना अतिशय कष्ट झाले. कारण की 75 पायऱ्या त्यांनी आपल्या हाताने चढल्या आणि तिरंगा फडकवला. रफिक शेख यांनी सांगितले की, मला जो काही 75 पायऱ्या चढण्याचा त्रास झाला तो त्रास जेव्हा माझ्या हातून तिरंगा फडकवला गेला त्यावेळेस तो हळूहळू कमी झाला. तिरंगा फडकवने ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. खरंतर सर्व धार्मिक स्थळांवरती भारत देशाचा तिरंगा कायमस्वरूपी फडकवला पाहिजे. कारण की आपल्या देशा शिवाय बाकी कोणताही जात धर्म पंथ मोठा नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही आमच्या दिव्यांगांच्या अनेक समस्या जैसे थे आहेत. आम्हाला देखील समाजामध्ये एक व्यक्ति म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि यासाठी आम्हाला सरकारतर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी ही रफिक शेख यांनी यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.