जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : कौतुकास्पद! साडेसहा वर्षांच्या कबीरनं साडेतीन तासांमध्ये केले कळसुबाई सर, VIDEO

Aurangabad : कौतुकास्पद! साडेसहा वर्षांच्या कबीरनं साडेतीन तासांमध्ये केले कळसुबाई सर, VIDEO

Aurangabad : कौतुकास्पद! साडेसहा वर्षांच्या कबीरनं साडेतीन तासांमध्ये केले कळसुबाई सर, VIDEO

औरंगाबाद शहरातील साडेसहा वर्षांच्या कबीर शिंदेने ( kabir shinde ) कळसुबाई हे शिखर फक्त साडेतीन तासांत सर केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    औरंगाबाद 13 ऑगस्ट: महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई या शिखराचं ( kalsubai shikhar ) नाव घेतलं जातं. शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून त्याची उंची सुमारे 900 मीटर आहे. कळसुबाई हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सची देखील दमछाक होते. मात्र, औरंगाबाद शहरातील साडेसहा वर्षांच्या कबीर शिंदेने ( kabir shinde ) हे शिखर फक्त साडेतीन तासांत सर केले आहे. यामुळे कबीरचं औरंगाबाद शहराच्या विविध भागातून कौतुक केले जात आहे. नेचर सेव्हिअर ग्रुपने ( Nature Saviour Group aurangabad ) नुकतीच कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. या मोहिमेत अवघ्या साडेसहा वर्षांच्या कबीर शिंदे याने सहभाग घेतला होता. अशी झाली ट्रेकिंगची आवड निर्माण औरंगाबाद शहरातील पैठण रोडवर राहणारा कबीर शिंदे वय साडेसहा वर्ष. कबीरचे वडील खाजगी शिकवणी मध्ये शिक्षक आहेत. त्याला एक मोठी बहीण देखील आहे. कबीरचे वडील लहानपणापासूनच दोघांना टेकड्या फिरवायला घेऊन जायचे कबीर अडीच वर्षांचा असताना वडील त्याला खांद्यावर घेऊन टेकडी चढत असतं. सुट्टीच्या दिवशी टेकड्या चढणं हे शिंदे परिवाराचे नेहमीचचं. टेकड्यांवरचे सुंदर वातावरण हवा झाडे व तिथून दिसणारे सुंदर दृश्य कबीर आणि त्याच्या बहिणीला आवडायला लागलं. यामुळे ते त्यांच्या वडिलांना प्रत्येक सुट्टीला कोणत्या ना कोणत्या टेकडीवरती घेऊन जायचे. औरंगाबाद शहरातील सातारा येथील साई टेकडी, बेगमपुरा भागातील हनुमान टेकडी, गोगाबाबा टेकडी, या सारख्या सर्वच टेकड्या त्यांनी फिरल्या आणि तेव्हापासून कबीरला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली.

    हेही वाचा-  Osmanabad : खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके; वडिलांचे छत्र हरवल्याने सुरू केला व्यवसाय

    नेचर सेव्हिअर ग्रुपने सर केलं कळसुबाई शिखर नेचर सेव्हिअर ग्रुपने कळसुबाई शिखर सर करण्याची प्लॅनिंग केली. यासाठी ग्रुपचे 16 सदस्यांनी सहभाग घेतला होत व साडेतीन तासांमध्ये कळसुबाई शिखर सर केलं. यामध्ये कमल जाधव, रुपेश जाधव, पूजा जाधव, दादासाहेब शिंदे , सीमा शिंदे, अश्विनी बनकर, दुहिता शिंदे, अशोक बनकर, वेदांत बनकर, चैतन्य बनकर, कांता गवळी, गोविंद गवळी उमेश मिसाळ, राम चौरे, ईश्वरी कुलकर्णी ,अशोक निर्मळ व कैलास जाधव यांचा सहभाग होता. ट्रेकिंग दरम्यान कबीरची शिक्षकाची भूमिका औरंगाबाद शहरामध्ये नेचर सेव्हिअर हा ग्रुप पर्यावरण संदर्भात काम करत असतो. कबीरचे आई - वडील या ग्रुपचे सदस्य आहेत. हा ग्रुप सुट्टीच्या दिवशी ट्रेकिंग करत असतो. आई-वडिलांसोबत कबीर आणि त्याची बहीण देखील असते. ग्रुपचा नियम आहे की ट्रेकिंगला गेल्यानंतर कोणीही प्लास्टिक फेकणार नाही. यावेळी चुकून एखाद्या सदस्याच्या हातून प्लास्टिक खाली पडलं तर त्या सदस्याला प्लास्टिक उचलण्याची आठवण करून देण्यासाठी कबीर हा पुढे असतो हे त्याचे वडील दादासाहेब शिंदे आवर्जून सांगतात. हेही वाचा-  Nashik : कॉमेडियन मामाची झटका पाणीपुरी, खाताना मनोरंजनाचीही खात्री, VIDEO एव्हरेस्ट शिखर सर करायचे आहे  मला आता मॉल पेक्षा निसर्गरम्य वातावरणात जायला खूप जास्त आवडतं.  यामुळे शहरातील सर्वच टेकड्या मी फिरल्या आहेत. आता महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर देखील बघितले आहे. आता मला एव्हरेस्ट शिखर सर करायचे आहे, असे कबीरने local18 शी बोलताना सांगितले. कबीर आणि माझी मुलगी या दोघांना मी लहानपणापासूनच टेकड्या बघायला घेऊन जात असतो. त्यामुळे त्यांना आता या टेकड्यांची सवय झाली आहे. दोघांनी पण साडेतीन तासांमध्येच कळसुबाई शिखर सर केलं. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात राहू दिलं तर त्यांना निसर्गाचे महत्त्व कळतं. यामुळे मी त्यां दोघांना निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ ठेवत असतो. इतर पालकांनी देखील मुलांना मोबाईल पासून दूर ठेवत निसर्गाच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया दादासाहेब शिंदे यांनी local18 शी बोलताना दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात