प्रशांत पांडे, प्रतिनिधी मुंबई, 06 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा अखेर पार पडला आहे. पण, कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे. बीकेसी मैदानावर 1 लाख 25 हजार लोक आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 65 हजार शिवसैनिक आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचाही रेकॉर्ड मोडीत काढला. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते. एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची जागा मोठी आहे. त्यामुळे या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे 1 लाख 25 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त)जमा झाले होते. (Dasara Melava : ‘आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची’, ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार) याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. पण, त्यांच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) उपस्थितीत होते.
अमित शाहंवरही टीका तर दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही यावेळी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मैदानाची क्षमता ही 50 हजार इतकी आहे. पण, यंदाच्या मेळाव्याला जवळपास 65 हजार लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे गर्दी जमवण्यामध्ये शिंदे गटाने सरशी केली आहे.