पुणे 11 सप्टेंबर : राज्यात शुक्रवारी जड अंत:करणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पाला थाटात निरोप देण्याची संधी गणेशभक्तांना मिळाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पुणे आणि मुंबईमध्ये तर लोकांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकांमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच एका व्हिडिओनं आता अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
पुणे पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विसर्जन मिरवणुकीत पोलीस तुफान डान्स करताना दिसत आहेत. pic.twitter.com/ziMeF23qdO
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांचे अनेक भन्नाट डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र, आता पुणे पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस तुफान डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विसर्जन मिरवणूक संपल्यानंतरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच कर्तव्य बजावण्यासोबतच पोलिसांनी भन्नाट डान्स करत मिरवणुकीचा आनंदही घेतला.
पुणे पोलिसांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ pic.twitter.com/n4POoDf1Si
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
पोलिसांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये महिला पोलिसही गाण्यावर ठेका धरत मनसोक्त नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे. गणेशोत्सवात बहुतेक पोलीस 24 तास कर्तव्यावर असतात. या 10 दिवसांच्या काळात त्यांना अनेकदा स्वतःसाठीही वेळ मिळत नाही.
सणासुदीच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बऱ्याचदा आपल्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेता येत नाही. मात्र, प्रचंड थकवा आणि ताण असतानाही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सगळा थकवा विसरून हे पोलीस ठेका धरताना पाहायला मिळाले. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police dance, Pune