मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! तुम्हालाही आलाय का वीज बिल भरण्यासंबंधीचा हा मेसेज? महावितरणनं दिला इशारा, हजारो ग्राहकांची झालीय फसवणूक

सावधान! तुम्हालाही आलाय का वीज बिल भरण्यासंबंधीचा हा मेसेज? महावितरणनं दिला इशारा, हजारो ग्राहकांची झालीय फसवणूक

Electricity Bill: सायबर गुन्हेगारांची वीज बिलावर नजर, हजारो ग्राहकांची फसवणूक, महावितरणनं दिला ‘हा इशारा

Electricity Bill: सायबर गुन्हेगारांची वीज बिलावर नजर, हजारो ग्राहकांची फसवणूक, महावितरणनं दिला ‘हा इशारा

तातडीने विजेचं बिल भरा आणि वीज तोडणी थांबवा या अर्थाचा मेसेज तुम्हालाही आलाय का? जरा नीट वाचा मेसेज, कारण सायबर भामट्यांनी आता MSEDCL अर्थात महावितरणची ऑनलाइन बिलं भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली आहे.

पुणे, 10 ऑगस्ट:  तातडीने विजेचं बिल भरा आणि वीज तोडणी थांबवा या अर्थाचा मेसेज तुम्हालाही आलाय का? MSEB किंवा MSEDCL च्या वतीने आलेला वाटत असला तरी असा मेसेज चक्क फसवणूक करण्याचा नवा मार्ग आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या सात महिन्यात ऑनलाईन फ्रॉडच्या तब्बल 15426 तक्रारी सायबर पोलिसांकडे नोंदल्या गेल्या आहेत. म्हणूनच अशी कोणत्याही फेक लिंक ओपन करू नये, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देतो. ऑनलाईन पेमेंट करणं सुलभ असलं तरी सायबर गुन्हेगारांची (Cyber Criminal) कायमच अशा प्रकारच्या व्यवहारांवर नजर असते आणि ते विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करतात. आता वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. सायबर भामट्यांनी आता  MSEB अर्थात महावितरणची ऑनलाइन बीलं भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली आहे.  एकट्या पुणे शहरात यासंबंधीच्या 311 तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. अशा फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणनं प्रेसनोट काढून लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. अनेक लोक वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट प्रणालीचा वापर करतात. हेच ओळखून ऑनलाईन बँकिंग वापरणाऱ्यांना लुटण्यासाठी सायबर भामट्यांनी नवाच फंडा शोधून काढला आहे. राञी झोपण्याच्यावेळी ते ग्राहकांच्या मोबाइलवर कॉल करतात आणि सांगतात की, “तुमचं लाईट भरलेलं नाही. पुढच्या तासाभरात तुमचं लाईट कनेक्शन कट होणार आहे आणि ते टाळायचं असेल तर आम्ही तुमच्या मोबाइलवर पाठवत असलेल्या ऑनलाइन लिंकवर जाऊन तात्काळ बील भरा.”

हेही वाचा- पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा झटका, गाशा गुंडाळण्याचे आदेश

राञीच्या वेळी घरातली लाईट कट होऊ म्हणून ग्राहकही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अलगद फसतात आणि सायबर गुन्हेगारांकडून त्यांची आर्थिक फसवणूक होते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावं?
  • महावितरणकडून केवळ नोदणीकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठवले जातात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा MSEDCL (उदा. VM- MSEDCL, VK- MSEDCL) असा असतो. त्यामुळं याशिवाय कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नये.
  • वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट एसएमएसना प्रतिसाद देऊ नये, तसेच यावरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
  • महावितरण MSEDCL शिवाय कोणतंही एप डाउनलोड करायला सांगत नाही. त्यामुळं वीज बिल भरण्यासाठी लिंक किंवा कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.
  • वीज बिल भरण्यासाठी महावितरणकडून कोणत्याही प्रकारचा कॉल केला जात नाही, त्यामुळं अशा फेक कॉलला बळी पडू नये.
  • Any Desk , team viewer, Quick support सारखे App डाउनलोड करू नये. कारण त्यामार्फत सायबर गुन्हेगार तुमची माहिती आणि डेटा चोरू शकतात.
Published by:Suraj Sakunde
First published:

Tags: Cyber crime, Electricity bill, Mseb

पुढील बातम्या