Home /News /maharashtra /

गणेशोत्सवाआधी मुख्यमंत्र्यांची मंडळांसाठी मोठी घोषणा, 'हे' 5 दिवस 12 पर्यंत स्पीकरला परवानगी

गणेशोत्सवाआधी मुख्यमंत्र्यांची मंडळांसाठी मोठी घोषणा, 'हे' 5 दिवस 12 पर्यंत स्पीकरला परवानगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली.

चंद्रकांत फुंदे, पुणे, 3 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवातील शेवेटचे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानी असेल. धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करु, असं मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला आहे. "पुण्याच्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. अनेकजण गणेशोत्सव पाहायला येत असतात. काही मागण्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी मंडळांसोबत बैठक पार पडली. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे सण-उत्सव साजरा करता आला नव्हता. पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचा आहे. मंडप शुल्क माफ केलाय. परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी सगळं पाहतील. मिरवणुका नियम पाळून करू, कुठल्याही अडचणी येणार नाही हे पाहू. कोर्टाचे नियम पाळू", असं एकनाथ शिंदे म्हणाले. (धर्मवीर आनंद दिघेंच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा, ठाकरेंच्या सेनेला धक्का) शेवटचे पाच दिवस 12 पर्यंत परवानगी आहे. धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करू. काळजी घेऊ, अजून कोरोनाचे नवीन व्हेरियंट येत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच सगळ्यानी बुस्टर डोस घ्या. गणपती मंडळांनीही सहकार्य करणं गरजेचं आहे. मंडळ सामाजिक कामे करत आहेत. मंडळांनी बुस्टर डोस जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्राशसन मदत करेल. दहीहंडी मंडळाला पण परवानग्या दिल्या आहेत, असं शिंदेंनी सांगितलं. पुण्यातील गणेश मंडळांच्या सर्वच मागण्या मुख्यमंत्र्यांनी एकाच धडाक्यात मान्य करून टाकल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते भलतेच खूश झाले आहेत. या सर्वांनी ऐसा सीएम होने नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मनापासून आभार मानले आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या