मुंबई, 13 जून : सामान्यत: महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरतात. त्वचा सुधारण्यासाठी मधाचाही जास्त वापर केला जातो. औषधी घटक असलेला मध त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, मध हा केसांसाठी सर्वोत्तम हेअर केअर ट्रीटमेंट देखील ठरू शकतो. केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी मधाचा शॅम्पू (Honey shampoo) खूप प्रभावी ठरू (Hair care tips) शकतो. हनी शॅम्पू वापरल्याने केसांना अनेक फायदे होतात. अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेल्या मधाच्या शॅम्पूमुळे केसगळती, कोंडा आणि डोक्याच्या त्वचेचा संसर्ग नाहीसा होऊ शकतो. तसेच केस मऊ, रेशमी आणि चमकदार राखण्यासाठी मधाचा शॅम्पू देखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. जाणून घेऊया मधाचा शॅम्पू घरी बनवण्याच्या पद्धती. मध आणि बेकिंग सोड्याचा शॅम्पू - मध आणि बेकिंग सोड्याचा शॅम्पू बनवण्यासाठी 1 चमचा कच्चा (शुद्ध) मध मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि गरम करा. आता त्यात 3 चमचे फिल्टर केलेले पाणी आणि 1 चमचे बेकिंग सोडा घाला. शॅम्पूला सुगंधित करण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते इशेंन्शिअल तेल घालू शकता. तुमचा हनी शाम्पू अशा पद्धतीनं तयार होईल. केसांना लावण्यासाठी आधी केस ओले करा. आता केसांना आणि मुळांना शॅम्पूने मसाज करा आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा. मध आणि व्हिनेगर शॅम्पू - हा शॅम्पू बनवण्यासाठी आपण मधासोबत व्हिनेगर वापरू शकता. यासाठी तीन-चतुर्थांश कप मध, तीन-चतुर्थांश कप कॅस्टिल साबण, 1 चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर आणि ऑरेंज किंवा व्हिनेगर इसेन्शल तेलाचे काही थेंब मिसळा आणि कुपीमध्ये भरा. आता केस ओले केल्यानंतर या शॅम्पूने केस आणि डोक्याला मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. तसेच, तुम्ही हा शॅम्पू 3-4 दिवसांनी पुन्हा वापरू शकता. हे वाचा - चिकनवर ताव मारणाऱ्यांना कोंबडीविषयी ‘ही’ गोष्ट नक्की माहीत नसणार मध आणि कोरफडीचा शॅम्पू - केसांचे अनेक प्रॉब्लेम्स आणि केसांना निरोगी बनवण्यासाठी ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. यासाठी कोरफडीची ताजी पाने कापून जेल बनवा. आता त्यात 2 चमचे मध मिसळा आणि मिश्रण करा, नंतर हा शॅम्पू ओल्या केसांवर लावा. थोडा वेळ मसाज केल्यानंतर केस साध्या पाण्याने धुवा. हे वाचा - Skin Care Tips: ‘हे’ घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.