मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याच्या या बाप्पाने केली कमाल, दोन विरोधक आले एकत्र; नेमकं काय घडलं?

पुण्याच्या या बाप्पाने केली कमाल, दोन विरोधक आले एकत्र; नेमकं काय घडलं?

पुण्यातील गणपती मंडळात घडला अनोखा प्रकार...

पुण्यातील गणपती मंडळात घडला अनोखा प्रकार...

पुण्यातील गणपती मंडळात घडला अनोखा प्रकार...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 9 सप्टेंबर : यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठीच विशेष होता. एकतर दोन वर्षांच्या कोरोनाच्या सावटानंतर यंदा नागरिकांनी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला. यंदा राजकीय नेत्यांनीही पुढाकार घेतला आणि मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंडळांना आवर्जुन भेट दिली. पुण्यात मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणूक एक आगळवेगळं चित्र पाहायला मिळतं.

राजकीय मैदानात एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले. भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे एकत्रच पुण्यातील कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. एकरी राजकीय व्यासपीठावरुन एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांनी एकमेकांना पाठ न दाखवता, एकत्रच बाप्पाची पालखी खांद्यावर घेतली.

Baramati Ajit Pawar : अजीत पवार म्हणतात कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असे कितीतरी जण आले आणि गेले 55 वर्षांत

नेमकं काय घडलं?

पुण्यात कसबा सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे दाखल झाले. यावेळी अनेकांसमोर प्रश्न उभा राहिला. मात्र दोघेही एकत्र आले आणि बाप्पाची पालखी एकत्रच खांद्यावर घेतली.

दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्यावरुन वाद सुरू झाला आहे. शिवसेनेमध्ये (shivsena) दोन गट स्थापन झाल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये (shinde group) रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्या घेण्यासाठी शिवसेनेनं दोन वेळा अर्ज केला आहे. पण, अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, 'दसरा मेळावा घेण्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही, नियमात असेल त्यांना मैदान दिले जाईल, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केलं आहे.

First published:

Tags: Aaditya Thackeray, BJP, Chandrakant patil, Pune, Shivsena