मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात 42 कोटींची फसवणूक; बिटकॉइन गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती आली समोर 

पुण्यात 42 कोटींची फसवणूक; बिटकॉइन गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती आली समोर 

बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवणे महगात पडले आहे.

बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवणे महगात पडले आहे.

बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवणे महगात पडले आहे.

पुणे, 18 ऑगस्ट : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताय मग सावधान. ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला आभासी चलनात गुंतवणूक करणं महागात पडू शकत. पुण्यात अशाच पध्दतीने मोठ्या परताव्याच्या आशेने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळींवर चालणाऱ्या या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला यापूर्वी अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. बिटकॅाईन सारख्या आभासी चलनात वेगवेगळ्या स्कीमच्या परताव्याच अमिष दाखवून सामान्य गुंतवणुकदारांकडून पैसे घेतले जातात. त्यासाठी कंपनी वेबसाईट तयार करून वॅालेट बनवून दिले जातात. त्याचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंधित गुंतवणुकदाराला दिले जातात. पैसे गुंतवल्यानंतर त्या गुंतवणूकादारांना काही काळ या वॉलेटमध्ये परतावा मिळाल्याचं आभासी चलनात दिसत. पुन्हा हे चलन गुंतवल्यास आणखी उत्तम परताव्याच अमिष दाखवल जातं. काही काळाने मात्र कंपनी वेबसाईट सगळच गुंडाळते आणि अशा प्रकारे गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं. Financial freedom: या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंता होतील दूर या प्रकरणात बिटकनेक्ट कंपनीचे प्रमुख सतिश कुंभाणी यांच्यासह साथीदारावर पुण्यात फसवणूकीसह गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. ज्यादा परताव्याच्या अमिषाने फिर्यादीला तब्बल 42 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून कुंभाणी आणि त्याच्या साथीदारांनी फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणूक प्रकरणी कुंभाणीसह त्याचे साथीदार सतिश जवेरीया, रणजीत सक्सेना, दिवेश दर्जी, विरेश चरंतीमठ, रंकेश दर्जी आणि मेहूल पाचीघर यांच्यावर पुण्यातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणी सतिश कुंभाणी याला अमेरिकन पोलिसांनी मागील काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. तो सध्या जामिनावर आहे. चव्हाण यांची आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तब्बल 220 बिटकॉईनची फसवणूक केली आहे. आजच्या बाजार भावानुसार ही बिटकॉईनची रक्कम 42 कोटींवर जाते. त्यामुळे जर तुम्ही आभासी चलनात गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर सावधान.
First published:

Tags: Financial fraud, Pune

पुढील बातम्या