मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Financial freedom: या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंता होतील दूर

Financial freedom: या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंता होतील दूर

Financial freedom: या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंता होतील दूर

Financial freedom: या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंता होतील दूर

Financial freedom: साधी जीवनशैली अंगीकारूनही तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. यामुळे तुमच्या हातात पैसे वाचतील जे तुम्हाला भविष्यात वापरता येऊ शकतात.

    मुंबई, 16 ऑगस्ट: आर्थिक स्वातंत्र्य (Financial freedom) म्हणजे तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाची आणि भविष्याची चिंता करण्याची गरज भासू नये अशी परिस्थिती होय. तुमचे सर्व छंद पूर्ण होऊ शकतील आणि तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं, असं म्हणता येईल. जर तुम्ही श्रीमंत कुटुंबातील नसाल तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य योजना बनवायला हवी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी या योजनेनुसार काम करायला हवं. तज्ञांचं मत काय- ट्रेडस्मार्टचे सीईओ विकास सिंघानिया म्हणतात, “विविध लोकांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी असू शकतो. काहींसाठी याचा अर्थ कर्जमुक्त होणं असू शकतो. काही लोकांना असं वाटू शकतं की पैसे मिळवण्यासाठी दररोज काम करण्याची गरज पडू नये. तथापि जेव्हा तुमच्याकडे व्याज, लाभांश किंवा व्यवसायातील नफ्याच्या स्वरूपात आयुष्यभर पुरेल एवढा पैसा असतो तेव्हा आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालं असं म्हणता येईल. ते पुढे म्हणाले की, भविष्यात कमाईची अपेक्षा ठेवून आर्थिक स्वावलंबन मिळवण्याबाबत बोलता येणार नाही. आर्थिक स्वातंत्र्य हे एकतर बँकेत पैसे असणं किंवा रोख प्रवाह, जे कोणत्याही परिस्थितीत तुमच्या गरजा पूर्ण करतात, ते असणं होय. दोन्ही प्रकरणांमध्ये, लवकर नियोजन सुरू करणं महत्त्वाचं आहे.  नियोजनाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं स्वप्न स्वप्नच राहू शकतं. सिंघानिया यांच्या मते, या पाच स्टेप्स फॉलो करून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. 1. योजना- आधी म्हटल्याप्रमाणं नियोजनाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य केवळ स्वप्नच राहील. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विवेकपूर्ण दृष्टिकोन आवश्यक आहे. नियोजनाद्वारे तुम्ही तुमचं आर्थिक स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करू शकता. 2. साधी जीवनशैली- साधी जीवनशैली जगल्यानं तुमच्या हातात पैसा राहील जो चांगल्या भविष्यासाठी जतन केला जाऊ शकतो. अवाजवी खर्च केल्यानं तुमच्या जीवनातील उद्दिष्टे साध्य करणं तुम्हाला कठीण होईल. साधी जीवनशैली तुम्हाला कमावलेला प्रत्येक संभाव्य रुपया वाचविण्यात मदत करेल. हेही वाचा- LIC Aam Aadmi Bima Scheme: केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूक अन् मिळेल 75 हजार रुपयांचा लाभ, समजून घ्या सोप्या शब्दात 3. विमा पॉलिसी- तुम्ही तरुण असताना तुम्हाला विमा पॉलिसी असण्याचं महत्त्व कळत नाही. एखादी दुर्घटना किंवा कोणतीही अनुचित घटना केवळ त्या व्यक्तीचेच नाही तर त्याच्या/तिच्या कुटुंबाचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुमच्या संरक्षणासाठी, तुम्हाला सर्वसमावेशक वैद्यकीय विमा आणि मुदत पॉलिसी घेणं आवश्यक आहे. तरुण वयात तुम्हाला यासाठी कमी प्रीमियम देखील भरावा लागेल. 4. गुंतवणूक सुरू करण्यासाठी घाई करा आयुष्याच्या सुरुवातीला आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, तुम्हाला चक्रवाढीचे सूत्र शिकून त्यावर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्याकडील पैसा वाढण्यासाठी दोन घटक महत्त्वाचे असतात, वेळ आणि गुंतवणुकीवरील परतावा. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही जितके पैसे गुंतवाल, तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल. म्हणूनच जीवनात लवकर बचत करणं महत्त्वाचं आहे. यासाठी आधी बचत करून नंतर खर्च करावा. 5. गुंतवणुकीचे निरीक्षण करणं आवश्यक आहे- नियोजनासह गुंतवणूक सुरू केली तरीही, विविध कारणांमुळे तुमचे नुकसान होऊ शकतं. ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नाही. यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे वेळोवेळी निरीक्षण करत राहणं महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीचे पर्याय आणि त्यांचा परतावा काळानुसार बदलत राहतो. म्हणूनच योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Financial benefits, Financial need

    पुढील बातम्या