पिंपरी, 04 जानेवारी: गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी एका व्यवसायिकाला भरचौकात गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. ही थरारक घटना ताजी असताना पिंपरी (Pimpri) शहराला हादरवणारी दुसरी एक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून दोन अल्पवयीन मुलांनी एका दुचाकीस्वाराची सिनेस्टाईल हत्या (bike rider killed by 2 minor boys) केली आहे. आरोपींनी मृत व्यक्तीला रस्त्यावर ओढत आणून भयावह पद्धतीने हत्या केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं (2 Accused arrested) आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुनील सगर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर चिखली पोलिसांनी 14 आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलं आपल्या मित्राची दुचाकी घेऊन जाधववाडी शिवरस्ता येथील रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या दुचाकीचा धक्का मृत सुनील सगर यांच्या दुचाकीला लागला. या किरकोळ अपघातानंतर दोन्ही अल्पवयीन मुलं घटनास्थळी थांबली. हेही वाचा- जन्मदात्यांसोबत क्रूरतेचा कळस; मुलाने कोयत्याने आईवर केले वार, बापाची छाटली बोटं दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून मृत सुनील आणि अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यानंतर सुनील याने दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर सुनील आणि दोन्ही अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची वाढत गेली. यामुळे सुनील हे जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेले आणि एका किरणा दुकानात जाऊन थांबले. पण पाठलाग करणाऱ्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत दुकानातून बाहेर काढलं. हेही वाचा- 21 वर्षीय तरुणीवर भरदिवसा सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना यानंतर आरोपींनी सुनील यांना रस्त्यावर आणून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच रस्त्यावरील सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून रक्तबंबाळ केलं. हा घाव इतका भयावह होता की, सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.