जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी; वाचा, काय आहे महत्त्वाचं कारण?

पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी; वाचा, काय आहे महत्त्वाचं कारण?

पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी; वाचा, काय आहे महत्त्वाचं कारण?

आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 2 सप्टेंबर : राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे अनेक जण बैलगाडा शर्यतीचे समर्थ करतात. तर दुसरीकडे प्राणीप्रेमी मात्र, या बैलगाडा शर्यतीला विरोध करतात. या बैलगाडा शर्यतीशी संबंधित पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंबेगावच्या तहसिलदारांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्याबाबतचे आदेश तहसिलदार जोशी यांनी नुकतेच काढले. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीवर तात्पूरत्या स्वरुपात निर्बंध आले आहेत. लम्पी स्किनचे संक्रमण होण्याचा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा ब्रेक लागला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील गावागावातुन बैल एकत्र येत असतात. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि भोरवाडी येथे बैलगाडा घाटात हा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार होता. मात्र, लम्पी स्किन आजाराचे जनावरांमध्ये संक्रमण वाढले आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी बैलगाडा शर्यती बंद करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. हेही वाचा -  काँग्रेसमध्ये काय सुरूये? आधी अशोक चव्हाण, आता कलमाडींच्या पुणे फेस्टिवलमध्ये भाजप नेत्यांची रेलचेल   प्रशासनाच्या आदेशात काय - गणेशोत्सवा निमित्त आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथे चार सप्टेंबरपर्यंत तसेच पुढील आदेश येईपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करू नये. तसे दहा किलोमीटर परिसरातील बाधित व निगराणी घोषित जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा, प्रदर्शन बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध राहील, असे तालुका प्रशासनाच्या आदेशात म्हटले आहे. आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात