यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला
हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हीच मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.
यानंतर झालेल्या मंदिर समितीच्या कार्यक्रमातदेखील ते सहभागी झाले. यावेळी पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या
यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते
विशेष म्हणजे महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले पती पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला.