मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जीव वाचवण्यासाठी यकृत घेवून कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा टायर फुटला आणि....

जीव वाचवण्यासाठी यकृत घेवून कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा टायर फुटला आणि....

रुग्णवाहिकेचा अपघात

रुग्णवाहिकेचा अपघात

अपघात झालेल्या रुग्णवाहिकेत यकृत होतं. हे यकृत कोल्हापूरहून पुण्याला नेलं जात होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 1 सप्टेंबर : संकट आपल्या आयुष्यात कधी कसं येईल, याचा काहीच अंदाज नाही. पण या संकटावर मात करणं आपल्याला जमलं पाहिजे. संकट काळात घाबरुन जावू नये. तर शांतपणे विचार करुन मार्ग काढला पाहिजे. कारण संकट आलं की आपल्यासमोर त्याला सामोरं जाणं आणि लढा देणं एवढाच एकमेव पर्याय असतो. त्यामुळे संकट काळात झुंज द्यायला हवी. विशेष म्हणजे संकट काळात आपण खचलो नाही आणि धैर्याने लढलो तर ते संकट कुठच्या कुठे विरळ होतं ते आपल्याला कळत देखील नाही. पण संकट काळात त्याला सामोरे जावून त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पुणे-सातारा महामार्गावर असाच काहीसा प्रकार बघायला मिळला.

पुणे-सातारा महामार्गावर एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेत असलेले डॉक्टर जखमी झाले. पण या अपघातावेळी स्थानिक पोलिसांनी केलेल्या उल्लेखणीय कामामुळे एका रुग्णाचा जीव वाचला. अपघात झालेल्या रुग्णवाहिकेत यकृत होतं. हे यकृत कोल्हापूरहून पुण्याला नेलं जात होतं. या दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर लागलेल्या ग्रीन कॉरिडोअरजवळ अचानक एक अनपेक्षित दुर्घटना घडली. यकृत घेवून पुण्याच्या दिशेला निघालेल्या रुग्णवाहिकेचं एक टायर फुटलं. यामुळे भीषण अपघात झाला. रुग्णवाहिकेत दोन डॉक्टर आणि पोलीस पायलट होते.

(सोसायटीत सुमडीत शिरला, सायकल घेवून पळाला, खारघरमध्ये चोरटा सीसीटीव्हीत कैद)

संबंधित घटना ही पुणे-सातारा महामार्गावर किकवी पोलीस ठाणे हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच किकवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. किकवी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुसऱ्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु केले. याशिवाय तातडीने यकृत घेवून रुग्णवाहिका पुण्याला पाठवली.

किकवी पोलिसांनी जलद गतीने केलेल्या व्यवस्थेमुळे यकृत वेळेवर पुण्याच्या रुग्णालयात पोहोचलं. तिथे वेळेवर यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. यकृत पोहोचण्यास थोडा जरी विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता. पण किकवी पोलिसांनी तसेच रुग्णवाहितेच असलेल्या पोलीस पायलट यांच्या मेहनतीमुळे यकृत शस्त्रक्रियेसाठी वेळेवर पोहोचलं. त्यामुळे पोलिसांचं देखील कौतुक होत आहे.

First published:

Tags: Organ donation, Pune Organ donation