जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : हजारो पुणेकरांचा 'त्यांनी' वाचवला जीव, काम समजल्यावर कराल सलाम!

Video : हजारो पुणेकरांचा 'त्यांनी' वाचवला जीव, काम समजल्यावर कराल सलाम!

Video : हजारो पुणेकरांचा 'त्यांनी' वाचवला जीव, काम समजल्यावर कराल सलाम!

अजय आडकर यांनी फक्त प्रशासनाला दोष न देता स्वयंस्फुर्तीनं काम सुरू केलं आहे. त्यांच्या या कामामुळे हजारो पुणेकरांचा जीव वाचला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 9 नोव्हेंबर : स्मार्ट सिटी म्हणून गवगवा होत असलेल्या पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था सर्व जगाला माहिती आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होता. वेगवेगळे शारीरिक आजार देखील वाहनचालकांना झाले आहेत. काही जणांचा यामध्ये जीव देखील गेला आहे. कोणत्याही शहरात खड्डे पडले तर प्रत्येक जण स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवतो. हे साहाजिक आहे. हे खड्डे बुजवणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या कामातील दिरंगाईचा त्रास सामान्य नागरिकांना बसतो. पुण्यातील अजय आडकर यांनी फक्त प्रशासनाला दोष न देता या विषयावर स्वयंस्फुर्तीनं काम सुरू केलं आहे. त्यांच्या या कामामुळे हजारो पुणेकरांचा जीव वाचला आहे. काय आहे मोहीम? अजय आडकर यांनी सामाजिक जाणीव ठेवत स्वयंस्फुर्तीने खड्डे दर्शक मोहीम सुरू केली आहे. त्यांनी पुणे शहरातील दीडशेहून अधिक खड्डे प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिलेत. त्यांच्या या कामामुळे पुणेकरांचा प्रवास काही प्रमाणात सुखाचा होतोय. शहरातील असंख्य अपघात टळले आहेत. आडकर यांनी चार वर्षांपूर्वी ही मोहीम सुरू केली. ‘मी चार वर्षांपूर्वी कारने जात होतो. मला अचानक एक मोठा खड्डा दिसला. माझी गाडी त्या खड्ड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. त्यावेळी इतरांनाही तो खड्डा दिसावा म्हणून त्या ठिकाणी दगड आणून ठेवला. याच प्रसंगापासून माझी खड्डे दर्शक मोहीम सुरू झाली.’

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘त्या घटनेनंतर माझे विचार करण्याची पद्धत बदलली. मला तेंव्हा खड्डा दिसला नसता तर माझा मोठा अपघात झाला असता. मी त्या घटनेपासून खूप काही शिकलो. त्यानंतर मला रस्त्यावर कुठेही खड्डा दिसला तर तो खड्डा इतरांना समजावा. त्यामुळे होऊ शकणारा अपघात टळावा यासाठी मी खड्डे दर्शक मोहीम सुरू केली,’ असे आडकर यांनी स्पष्ट केले. कसे करतात काम? आडकर यांच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक जण यामध्ये सहभागी होत आहेत. ज्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतात त्या खड्ड्यांना पांढरी पिशवी किंवा पोत्यांनी दगड लावून ते ठेवतात. झाडांच्या फांद्या देखील तिथं ठेवल्या जातात. त्यामुळे रस्त्यावरील त्या भागात खड्डा आहे, हे सर्वांना अगदी दुरून समजतं. पांढरे पोते असलेला दगड असल्यामुळे अगदी आंधारातही पन्नास मीटर किंवा त्याहून जास्त अंतरावरून खड्डा असल्याची माहिती मिळते. ते खड्डा टाळून सुखरूप प्रवास करू शकतात. आडकर यांनी आत्तापर्यंत सुमारे दीडशे ठिकाणी खड्डेदर्शक लावले आहेत. Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती! प्रत्येक वेळी प्रशासनाकडं बोट दाखवण्यापेक्षा आपणही सामाजिक जाणिवेतून काम केलं पाहिजे. प्रत्येकाने या प्रकारचे अपघात टाळण्यासाठी खड्डे दर्शक लावले पाहिजेत, अशी अपेक्षा आडकर यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , pune
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात