जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्ता ओलांडताना दुचाकीच्या चाकात अडकलं माकड, पुढे काय घडलं पाहा Video

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या चाकात अडकलं माकड, पुढे काय घडलं पाहा Video

Viral Video

Viral Video

माकड वेगाने धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं, पण दुर्दैवाने ते भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या चाकात अडकलं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई ११ नोव्हेंबर : प्राण्यांना बोलता येत नाही, त्यामुळे संकटात सापडल्यावर अनेकांना जीव गमवावा लागतो. बऱ्याचदा मानवी वस्तीत एखादा प्राणी अडचणीत सापडला असेल तर लोक त्याला मदत करून त्याचा जीव वाचवतात. काही वेळा तर लोकांनीच प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याची प्रकरणं समोर येतात. आता एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माकड रस्ता ओलांडताना दुचाकीच्या चाकात अडकतं. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडिओत अडकलेलं हे माकड जिवंत राहणार नाही, असं आपल्याला वाटतं, पण बाईकस्वाराने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचा जीव वाचतो. माकडाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. माकड वेगाने धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं, पण दुर्दैवाने ते भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या चाकात अडकलं. सुदैवाने दुचाकीवरील व्यक्तीने तात्काळ ब्रेक लावल्याने माकडाला कोणतीही इजा झाली नाही. या घटनेच्या व्हिडिओमध्ये माकड समोरील ऍलॉय व्हील आणि बाइकच्या टायरमधील एका छोट्याशा गॅपमध्ये अडकलेलं दिसत आहे. माकड चाकाच्या मध्यभागी अडकलं होतं आणि ते जराही हालचाल करू शकत नव्हतं. चाकात अडकलेलं माकड वेदनेनं विव्हळत होतं, ते पाहून स्थानिक नागरिक त्याच्या मदतीसाठी धावले. माकडाला चाकातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही.

    लोकांनी मात्र त्या माकडाला वाचवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. माकडदेखील कोणताही आवाज व हालचाल न करता गप्प बसले. प्रयत्न करूनही माकडाला चाकातून बाहेर काढण्यात यश न आल्याने काही जणांनी गाडीचं चाक उघडण्याचा निर्णय घेतला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पुढे या लोकांनी चाक उघडलं आणि त्या माकडाला सुखरुप त्यातून बाहेर काढलं हे या व्हिडिओत दिसत आहे. माकड कोणतीही हालचाल करत नसल्याने चिंतेत पडलेल्या नागरिकांनी यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. माकड अगदी सुखरुप होतं, चाकात अडकल्याने त्याला मोकळा श्वास घेता येत नव्हता, मात्र नंतर माकडाने हालचाल केली. तसंच अचानक येऊन चाकात घुसल्याने माकडाला किरकोळ दुखापत झाली होती. हा व्हिडिओ पाहून लोकांनी माकडाला वाचवणाऱ्या स्थानिकांचं कौतुक केलं आहे. चालकाने राखलेलं प्रसंगावधान आणि स्थानिकांनी वेळीच मदत केल्याने या मुक्या प्राण्याचा जीव वाचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही स्थानिकांचं कौतुक करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात