पुणे 01 डिसेंबर : अतुल्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या नावाखाली 2016 ला रेहान एंटरप्राइजेस नावाने मुंबईत कंपनी सुरू झाली. रेहानचे मालक महादेव जाधव आहेत. सुरुवातीला सिंगापूर आणि दुबईला ऑफिस असल्याचे सांगण्यात आले. शेअर मार्केट क्रिप्टो करन्सी रियल इस्टेट फॉरेक्स इत्यादी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिश दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती या कंपनीत गुणवणूक केलेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांनी दिली आहे. या फसवणूक प्रकाराबाबत माहिती देतांना गुंतवणूकदारांनी सांगितले की, रेहान इंटरप्राईजेसने पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली सह गुजरात, वाराणसी, लखनऊ आणि देशातील इतर राज्ये व शहरांमध्ये आपले एजंट नेमले. या एजंटनी आजपर्यंत साधारण 11 हजार गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी तयार केले. सुरुवातीला गुंतवणूकदारांना नफ्याचे पैसे देण्यात आले काही लोकांना काहीच पैसे मिळालेले नाहीत. पुण्यात असे 700 ते 800 गुंतवणूकदार आहेत. यात सामान्य घरातील पुरुष- महिला, डॉक्टर्स, पोलीस, वकील आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्यांची हजारो कोटींची फसवणूक झाली आहे.
Video : सोशल मिडियावर चोरांचा सुळसुळाट, फसवणूक टाळण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तर देण्यात आली
या लोकांनी आपली तुटपुंजी रक्कम जमा करून रेहान मध्ये गुंतवली आहे. रेहान चे मुंबई ऑफिस बंद केले आहे. पुण्यातील बाणेर भागातील ऑफिस देखील बंद केले आहे. यातील काही गुंतवणूकदारांना संशय आल्याने चौकशी केली असता, संपर्क केला असता त्यांना उडवा उडवीची उत्तर देण्यात आली तसेच धमकीही देण्यात आली. रेहान इंटरप्राईजेस विरोधात लखनऊ येथे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली तसेच वाराणसीला पण गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदवली आहे. पुण्यातल्या गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली असल्याचेही त्यांनी सांगितले. रेहान कंपनी मालक तसेच एजंट यांना त्वरित अटक करावी मुंबईत देखील रेहान विरोधात तक्रार नोंदवल्या गेल्या आहेत. एका शहरात गुंतवणूकदार जमा करायचे तिथे उघडकीस आले की दुसऱ्या शहरात ऑफिस थाटायचे अशा स्वरूपाचे त्यांची कार्यपद्धती दिसून येते. संपूर्ण देशात साधारण 3000 ते 3500 करोड रुपयाची फसवणुकीचा प्रकार असून रेहान आता नवीन कंपनी स्थापन करून गुजरात मध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार करत आहे. पोलिसांनी रेहान कंपनीच्या मालक तसेच एजंट यांना त्वरित अटक करावी वेळ पडली तर सीबीआय चौकशी करावी अशी मागणी या गुंतवणूकदारांनी केली आहे.