मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : सोशल मिडियावर चोरांचा सुळसुळाट, फसवणूक टाळण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Video : सोशल मिडियावर चोरांचा सुळसुळाट, फसवणूक टाळण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

X
भूलथापांना

भूलथापांना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटका देखील सहन करावा लागतो. अशा घटनांची संख्या नागपूर शहरात देखील बळावली आहे.

भूलथापांना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटका देखील सहन करावा लागतो. अशा घटनांची संख्या नागपूर शहरात देखील बळावली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 30 नोव्हेंबर : सायबर गुन्हेगार नेहमीच नवनव्या क्लृप्त्या वापरून सोशल मीडिया, फेक कॉल, आणि अनोळखी लिंकच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करतात. त्यासाठी प्रत्येक वेळी ते नवनवे फंडे वापरत असतात. गुन्हेगारांच्या या भूलथापांना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटका देखील सहन करावा लागतो. अशा घटनांची संख्या नागपूर  शहरात देखील बळावली आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून काही टिप्स देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकेल. 

हल्ली सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करू नये, अनोळखी लिंक ओपन करू नये, कार्ड डिटेल्स कुणालाही शेअर करू नये, तसेच खात्री केल्याशिवाय कोणाच्याही खात्यात पैसे पाठवू नये, या गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या तर संभाव्य आर्थिक फ्रॉड होणार नाही आणि बँकेतील पैसेही सुरक्षित राहण्यास मदत होते.

2 स्टेप व्हेरिफिकेशन महत्त्वाचे 

सोशल मीडिया संबंधीत खातेधारकांनी आपले सोशल मीडिया प्रायव्हेट मोडवर ठेवावे. तसेच 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून ठेवावे जेणेकरून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी मदत होऊ शकते, अशी माहिती सायबर पोलीस स्टेशन छावणी सदरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल दौंड यांनी दिली.

प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर!

याद्वारे होऊ शकते फसवणूक

सायबर फ्रॉडमध्ये गुन्हेगार आपल्याशी तीन मार्गाने संपर्क करतो. त्यात कॉल किंवा एसएमएस केला जातो आणि जर आपण प्रतिसाद दिला नाही तर  सोशल मीडियाद्वारे संपर्क केला जातो. अनेक प्रकारचे आमिष दाखवले जातात जसे की, लॉटरी, विज बिल, 5 जी सेवा, अश्या भूलथापांना बळी न पडता असा मेसेज आला असेल त्यांना त्वरित ब्लॉक करावे. खातरजमा झाल्याशिवाय कुणालाही रिप्लाय करू नये. अनवधानाने कुणासोबत अशी घटना घडली आर्थिक स्वरूपात अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झाली तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी.

नागराजचा हिरा काळवंडला! ‘झुंड’मध्ये अमिताभसोबत काम केलेल्या अभिनेत्याला अटक

या ॲपपासून राहा सावध 

एनी डेस्क ॲप, क्विक सपोर्ट ॲप, टीम सपोर्ट ॲप, इत्यादींसारख्या स्क्रीन शेअरिंग अँप्लिकेशनच्या माध्यमातून पर राज्यातील गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या मार्गाने ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावतात व आपल्या मोबाईलचा एक्सेस मिळतात. याद्वारे ओटीपी शेअर होऊन आपल्या खात्यातील पैसे परस्पर वळते केले जातात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवे आणि अनोळखी ऍप्लिकेशन डाउनलोड न करता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल दौंड यांनी केले.

First published:

Tags: Local18, Nagpur